दोन मंत्र्यांसह सहा आमदारांच्या जोरावर काॅंग्रेस उमेदवार बाजी मारणार कि मोदींच्या नावावर पुन्हा भाजप उमेदवार विजयी होणार?
विजयपूर प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
विजयपूर राखीव लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या वतीने विद्यमान खासदार, सतत तीन वेळा विजयी झालेले रमेश जिगजिनगी यांनाच उमेदवारी दिली असून, काॅंग्रेस पक्षाकडून गेल्या तीन लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या बंजारा समाजाचे प्रकाश राठोड यांच्या ऐवजी दलित समाजातील प्राध्यापक राजू अलगूर यांना निवडणूकेचा रिंगणात उतरविले आहे.
कर्नाटक राज्यात काॅंग्रेस पक्षाचे सरकार असून विधानसभा निवडणुकी दरम्यान दिलेल्या पाच गॅरंटी योजनांची अंमलबजावणी सुरू आहे तर जिल्ह्यातील दोन आमदार मंत्रीपदावर तर लोकसभा मतदारसंघात दोन मंत्र्यांसह सहा आमदार काॅंग्रेस पक्षाचे आहेत. या सर्वांचा जोरावर काॅंग्रेस पक्षाचे उमेदवार राजू अलगूर बाजी मारणार कि, राममंदिर, कलम ३७० रद्द, हिंदुत्व, देशातील भाजपा अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील अनकुल वातावरण, मोदी कि गॅरंटी च्या जोरावर पुन्हा भाजप उमेदवार रमेश जिगजिनगी यांच्याच गळ्यात विजयाची माळ पडणार का हे पाहावे लागेल.
जिल्हा पालकमंत्री मंत्री एम.बी. पाटील यांचं कट्टर समर्थक असलेले काॅंग्रेस पक्षाचे उमेदवार राजू अलगूर यांना मंत्री शिवानंद पाटील, इंडीचे आमदार यशवंतराय गौडा पाटील, सिंदगीचे आमदार अशोक मनगोळी, नागठाण राखीव मतदारसंघाचे आमदार विळ्ळल कटकदोंड, मुद्धेबिहाळचे आमदार अप्पाजी नाडगौडा यांच्यासह विधानपरिषदेचे सदस्य सुनिलगौडा पाटील यांचा पाठिंबा तर मिळणारच, राज्यात भाजप व निधर्मी जनता दलात मैत्री असल्यामुळे देवरहिप्परगीचे निधर्मी जनता दलाचे आमदार राजूगौडा पाटील यांचाही पाठिंबा मिळणार आहे.
त्याच बरोबर मागील तीन लोकसभा निवडणुकीत दलित विरुद्ध बंजारा समाजाच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत झाले होते, या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने बंजारा समाजाच्या उमेदवार एवजी दलित समाजातील प्राध्यापक राजू अलगूर यांना उमेदवारी दिली असल्यामुळे त्यांचाही लाभ काॅंग्रेसला मिळेल असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
विजयपूर राखीव लोकसभा मतदारसंघात लिंगायत, अल्पसंख्याक, दलित, कुरुब, बंजारा समाजाचे मतदारांची संख्या लक्षणीय आहे अल्पसंख्याक मुस्लिम समाजाची मते बहुतेक काॅंग्रेस पक्षास जातील. दलित समाजातील मतं यावेळी विभागली जाणार हे नक्की! लिंगायत समाजातील पंचमसाली, घाणगा, बनजगा समाजाची मते भाजपाच्या पारड्यात पडण्याची शक्यता दिसून येते. राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मुळे व भाजपाचे ज्येष्ठ नेते के.एस. ईश्वरप्पा यांच्या नाराजी मुळं कुरुब समाजाचे मते काॅंग्रेस कडे जातील असे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
बंजारा समाज या निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यास वंचित झाला असल्यामुळे नाराज आहेत. बंजारा समाजाची मत विभागणी होईल, अधिक तर मतं काॅंग्रेसच्या पारड्यात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ब्राह्मण, मराठा, क्षत्रिय समाजाचे मते नेहमी प्रमाणे भाजपाला देतील.
मागील तीन निवडणूकेपेक्षा या निवडणुकेत भाजपा व काँग्रेस पक्षाचे दलित डाव्या व उजव्या समाजातील उमेदवारांमध्ये काटे कि टक्कर होणार एवढे मात्र नक्की!
विजयपूर लोकसभा १७ सार्वत्रिक निवडणुकेत आजपर्यंत काॅंग्रेस पक्षानं आठ वेळा विजयी मिळविला असून तर भाजपाने पाच वेळा विजयी मिळविला आहे. तर जनता दल, जनता पक्ष, स्वतंत्र पक्ष, व अपेक्ष उमेदवारांना प्रत्येकी एकदा बाजी मारली आहे.