" स्वराज्य " चे पोलीस रक्षक आरोग्य तपासणी शिबिरास उदंड प्रतिसाद!
अक्कलकोट/ प्रतिनिधी- चंद्रकांत वेदपाठक
दि. 2 " स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेने लोकसभा निवडणुक पूर्व अक्कलकोटच्या पोलिसा करिता आरोग्य तपासणी व वैद्यकीय सल्ला शिबिराचे आयोजन करून पोलिस दलांचे शारीरिक व मानसिक मनोबल वाढीस मदत केली आहे " असे उदगार अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांनी काढले आहे.
स्वराज्य माहिती अधिकार संघटना अक्कलकोट व ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पोलीस रक्षकांचा आरोग्य तपासणी व वैद्यकीय सल्ला शिबिराचे उद्घाटन प्रसंगी तहसीलदार विनायक मगर बोलत होते. या शिबिराचे उद्घाटन श्री स्वामी समर्थ महाराज प्रतिमेला पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करुन मगर यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत स्वराज्यचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांनी केले. पोलिसांनी कर्तव्य पार पाडत असताना कोणती व कशी काळजी आणि दक्षता घ्यावी या बाबत ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. रवींद्र बनसोडे यांनी वैद्यकीय सल्ला दिला .
या प्रसंगी उत्तर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी राजेंद्र टाकणे, साऊथ पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी महेश स्वामी स्वराज्य चे विश्वस्त उमेश काशीकर, स्वराज्यचे जिल्हा अध्यक्ष दिनेश काटकर, या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. आरोग्य तपासणी शिबिर ग्रामीण रुग्णालयात दिवसभर सुरू ठेवल्याने पोलिसांकडून त्यास उदंड प्रतिसाद लाभला.
शिबिर यशस्वी करण्यासाठी स्वराज्य चे तालुका उपाध्यक्ष दिपक पोतदार, उपाध्यक्ष गौरीशंकर चनशेट्टी, कार्याध्यक्ष दयानंद बिडवे, सचिवा सौ. वर्षा चव्हाण, पंकज कोरेकर, काशिनाथ पोतदार, स्वराज्य चे जिल्हा महिला अध्यक्षा डॉ. धारा नीरज वोरा, मेडिकल ऑफिसर डॉ. चव्हाण, डॉ. प्रथमेश जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ बाबासाहेब सुलतानपुरे व प्रसाद पाटोळे, मारुती धर्मसाले, राघवेंद्र करजगिकर, हुसेन बादशाह मुजावर, विनोद डांगे, बसवराज याबजी,बजरंग माली, चितली, कामाठी,आलाहपुरे,मुल्ला
आदींनी विशेष परिश्रम घेतले.