करजगी येथे वृक्षतोड जोमात
अक्कलकोट प्रतिनिधी/दि- 05
सध्या ४४ डिग्री तापमान आहे. अक्कलकोट तालुक्याती दिवसेंदिवस झाडांची बेसुमार कत्तल करण्यात येत असल्याने झाडांची संख्या कमी होत आहे.
अक्कलकोट तालुक्यातील करजगी पासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर अक्कलकोट रोडवर कडूलिंब व इतर जातीचे मोठ-मोठ्या बेकायदेशीररित्या झाडे तोडण्यात आले आहेत.याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर होत आहे वनविभागाचे लाकूड माफीयावर धाक नसल्याने दिवसाढवळ्या झाडे तोडण्यात येत आहेत.वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
करजगी व इतर भागात कोळसा भट्ट्या जोमात सुरु आहेत. याची त्वरित दखल घेऊन संबंधितावर वनविभागाने कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी मधून होत आहे.