अक्कलकोट स्टेशन जवळील जुगार अड्डा वर कारवाई कधी?
कोणाच्या आधारावर चालु आहेत; अंदर-बाहर
अक्कलकोट- तालुक्यातील अक्कलकोट स्टेशन लगत मोठ्या प्रमाणात व राजरोसपणे जुगारचा अड्डा गेल्या कित्येक महिन्यांपासून चालु आहे,ह्या जुगार अड्ड्याबद्दल अनेक दैनिकात, न्युज चॅनेल, पोर्टल ला बातम्या आले तरी ह्या अड्ड्यांवर कधीच कारवाई झाली नाही असे चर्चा सर्वञ सुरु आहे.
तालुक्यातील अनेक गावात लहान मोठे मटका, जुगार चालु आहेत माञ अक्कलकोट तालुक्यात काही तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असताना देखील तिथे राजरोसपणे जुगार चालु आहे. तालुक्याचे आमदार कल्याणशेट्टी यांनी अनेकदा म्हणाले की मटका- जुगार तालुक्यात चालु होऊ देणार नाही,हे फक्त घोषणा आहे का? कारवाई कधी होणार? कोणाच्या आधारावर चालु आहेत अंदर-बाहर असे अनेक प्रश्न; प्रश्नच राहिले आहेत.
महाराष्ट्रातील अनेक तालुक्यात शाळा, महाविद्यालये, कारखाने, युवा पिढीला नवनवीन रोजगार मिळुन विकसीत झाले असताना आपल्या तालुक्यातील काॅलेजच्या मुले सकाळी आकडे लावुन दुपारी ओपन काय आला म्हणून टपरी वाल्यांना विचारतात, रविवार सुट्टीच्या दिवशी पत्ते खेळुन पैशाचा उधळ पट्टी करतात याचे कारण कोण? असे अनेक प्रश्न पालकांना देखील पडत आहे.
तालुक्यातील विना परवाना जुगार अड्डा वर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 लागु करुन तिर्थस्थळातील जुगार मुक्त करण्याची आस्था लोकांनी ठेवले आहे.