दुधनी रेल्वे स्टेशन जवळील किराणा दुकान जळुन खाक
शाॅट- सर्किटमुळे आग लागुन सात लाखांची नुकसान
अग्निशमनदलानी फिरवली पाठ
दुधनी- येथील रेल्वे स्टेशन जवळील भिमाशंकर अमृत कल्याणशेट्टी यांच्या किराणा दुकानाला शाॅट- सर्किटमुळे भिषण आग लागुन सात लाखांची नुकसान झाले आहे.
नेहमीप्रमाणे भिमाशंकर यांनी राञी दुकानातील लाईट बंद असल्याची खात्री करून दुकानला कुलुप घातले, मध्यरात्री सुमारे एक ते दीडच्या सुमारास दुकानाला भीषण आग लागली, आजु बाजुतील लोक गाढ झोपेत होते तितक्यात हैदराबादला जाणारी एक्सप्रेस मधील प्रवाशांनी मोठ मोठ्यानी आवाज दिल्याने स्टेशन मधील घरातील लोक जागे होऊन घटनास्थळी आग विझवण्याचा प्रयत्न केले पण तो पर्यंत आग रौद्र रूप धारण केले होते व दुकानातील फ्रिज, झेराॅक्स मशीन, व किराणा मालासकट जळुन खाक झाला होता.
दुधनी अग्नीशमाक दल फक्त कर वसुलीसाठीच- स्थानिक लोक
दुधनी येथे ह्यापूर्वी ही दोन तीन दुकानाला आग लागली होती तेव्हा ही अग्निशमनदल वेळेवर पोहचली नाही, राञी 2 वाजता फोन केले असता कोणीच फोन उचलले नाही, शेवटी स्थानिक लोकांनी मक्कादमाला भेटले असता गाडी खराब झाल्याची सांगितले. त्यामुळे स्थानिक लोकांनी आक्रोश व्यक्त करत अग्निशमनदल फक्त आमच्या घरपट्टीमध्ये कर वसुलीसाठीच आहे का असे अनेक प्रश्न नागरिकांना पडत आहे.
ह्या घटनेत सात लाखांची नुकसान झाले असल्याचे माहिती दुकान मालक भिमाशंकर अमृत कल्याणशेट्टी यांनी सांगितले.