श्री एस जी परमशेट्टी प्रशालेत वार्षिक आरोग्य तपासणी संपन्न
दुधनी/ प्रतिनिधी - विश्वनाथ राठोड
अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील श्री शांतलिंगेश्वर शिक्षण प्रसारक संस्था हिरेजेवरगी दुधनी संचलित श्री एस जी परमशेट्टी प्रशालेत वार्षिक आरोग्य तपासणी कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ राखी खंडाळ ह्या होते, याप्रसंगी सातवी ते दहावी सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता दुधनी प्राथमिक आरोग्य केंद्र दुधनी यांच्याकडून मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले .
याप्रसंगी दुधनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी प्रकाश चौधरी व मंजुनाथ पाटील यांच्या नेतृत्वात एस जी परमशेट्टी प्रशालेत आरोग्य तपासणी संपन्न झाली. या आरोग्य तपासणीत ब्लड ग्रुप तपासणी ,यकृत, फुफ्फुस कार्यक्षमता, थायरॉईड टेस्ट ,कॅल्शियम, हिमोग्लोबिन, तसेच इतर अनेक घटकांचा समावेश यामध्ये करण्यात आला होता. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद उत्स्फूर्त होता हे त्यावेळी दिसून आले .एकूण डॉक्टर नर्स व इतर कर्मचाऱ्यांची संख्या 18 जणांची टीम या प्रशालेत विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी सक्रिय होते.
यावेळी मुख्याध्यापक रेवणसिद्ध अलीगावे यांनी सुबद्ध नियोजन केल्याने आरोग्य तपासणी सुकर झाली या प्रसंगी सर्व आरोग्याधिकारी यांचे प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक लक्ष्मीपुत्र गद्दी, आरोग्य अधिकारी रेखा फड ,वैद्यकीय आरोग्य अधिकारी कविता देशमुख, महिबूब मुजावर, नागुबाई काळे, शरद कुलकर्णी, कुष्ठरोग तज्ञ राजेंद्र चौगुले, महेश झळकी, प्रयोगशाळा तज्ञ सुनील कोटनूर, यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रभावती हौदे , परमेश्वर कोळी, दत्तात्रय हिळळी, रामलिंग मंजुळकर, सुरेश बिराजदार ,महानिंग सोमेश्वर, धर्मा भोसले, सौ लक्ष्मी म्हेत्रे यांच्यासह अनेक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागराज कलबुर्गी यांनी केले तर मान्यवरांचे आभार सिद्धाराम नुला यांनी मानले.