13 जुलै रोजी पत्रकार दिनाचे आयोजन
विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
जिल्हा श्रमिक पत्रकार संघ आणि वृत्त व जनसंपर्क विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन सोहळा, जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकारांचा सत्कार व पत्रकारांच्या मुलांसाठी प्रतिभा पुरस्कार
वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ 13 जुलै रोजी आयोजित करण्याचे निर्णय घेण्यात आला.
शहरातील श्रमिक पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संगमेश चुरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
हा सोहळा शिस्तबद्ध व अर्थपूर्ण पद्धतीने आयोजित करण्याचे ठरले आणि त्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या.
कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे मंत्री, आमदार, विधान परिषद सदस्य, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक्ष यांना आमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार के.व्ही.प्रभाकर, कानिप संघाचे राज्य अध्यक्ष शिवानंद तगडुर, सरचिटणीस जे.सी.लोकेश, जिल्हा प्रभारी पुंडलीक बालोजी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्याचे ठरले.
कानिप संघाचे जिल्हा उपाध्यक्ष इंदुशेखर मनुर यांनी सविस्तर माहिती दिली सचिव मोहन कुलकर्णी यांनी स्वागत केले. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य महेश शटगार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य के.के.कुलकर्णी, सचिव अविनाश बिदरी, कोषाध्यक्ष राहुल आपटे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशोक यडल्ली, गुरू गद्धनकेरी, बसवराज उल्लागड्डी, विनोद सारवाड, सुनिल कांबळे, सुनिल गोडेण्णावर, आदी उपस्थित होते. जिल्हा अध्यक्ष संगमेश चुरी यांनी समारंभ यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.