पत्रकार संघाच्या वार्षिक प्रशस्ती प्रधान कार्यक्रम दि. 28 रोजी
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन व दरवर्षी देण्यात येणाऱ्या वार्षिक प्रशस्ती प्रधान कार्यक्रम दि. 28 जुलै रविवार रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संगमेश चुरी व मुख्य सचिव मोहन कुलकर्णी यांनी दिली आहे.
शहरातील पोलिस समुदाय भवनात आयोजित जिल्हा पत्रकार संघ व वार्ता व सार्वजनिक संपर्क खाते त्यांच्या सहकार्याने होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पालकमंत्री एम.बी.पाटील यांचा हस्ते करण्यात येणार असून प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री शिवानंद पाटील, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे माध्यम सल्लागार के.व्ही. प्रभाकर, संघाचे राज्य अध्यक्ष शिवानंद तगडूर, खासदार रमेश जिगजिनगी व जिल्ह्यातील आमदार उपस्थित राहणार आहेत त्यांच्या हस्ते वार्षिक प्रशस्ती प्रधान व पत्रकारांचा मुलांना प्रतिभा पुरस्कार देण्यात येणार आहे.
31 जनांना जिल्हा प्रशस्ती
दैनिक विजय वाणीचे स्थानिक संपादक के.एस. रमेश, दै.विजय कर्नाटकचे स्थानिक संपादक इरण्णा यंबीगौडर, दै. कन्नडदिप संपादक के.के. कुलकर्णी, दै. गुम्मट नगरीचे व्यवस्थापक इरफान शेख, दै.उदय वार्ताच्या संपादकी लक्ष्मी वालीकर, रीपब्लीक न्यूज चॅनलचे कॅमेरामन सुनिल कांबळे, इन न्यूज नेटवर्कचे पत्रकार विजय सारवाड यांच्या सह जिल्ह्यातील तालुक्याचे एकूण 31 पत्रकारांना जिल्हा वार्षिक प्रशस्ती जाहीर करण्यात आली आहे.
याच समारंभात दहावी व बारावीच्या परीक्षेत 80 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या पत्रकारांचा मुलांना प्रतिभा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.