सराफ दुकानातील चोरी प्रकरणी दोघांना अटक, सोन्याचं, चांदीचे दागिने जप्त
विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
जिल्ह्यातील तालिकोटी शहरात दि. 22 व 23 मे च्या रात्री विद्यानगर वसाहत येथील शिवकुमार बसण्णा कंभार यांच्या मालकीच्या अमृता ज्वेलर्स दुकानाची चावी तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पळून गेलेल्या आरोपीला पोलिसांनी शोधून अटक केली आहे त्या रात्री अमृता ज्वेलर्स दुकानाचा वीज पुरवठा तोडून 77 ग्रॅम सोन्याचे दागिने, किमंत 539000 रुपये, 253 ग्रॅम चांदीचे साहित्य किंमत 20,240 रुपये व 5 हजार रुपये रोख चोरून नेले होते जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश सोनावने व अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमण गौडा हत्ती, डीआय एसपी बल्लप्पा नंदगावी सीपीआय मल्लिकार्जुन तुलसीगेरी, पीएसआय रमण गौडा संकनाळ, गुन्हे शाखेचे पीएसआय आरएस भांगी, पोलिस कर्मचारी बी.जी. बालकल्ला, एम.एल. पट्टेद, एम. के. डोनूर, सैफन कुरी, संजू दोडमणी, एस. पी. जाधव, संगमेश चलवादी, पी. एन. पुजारी, एक तपास पथक तयार करण्यात आले.
ही बाब गांभीर्याने घेत पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चोरीचे कृत्य करणाऱ्या आरोपी देवेंद्र तळवार व मल्लन्ना बुदिहाळ या दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चोरीचा गुन्हा कबूल केला आहे. आरोपीच्या सोन्याचं दागिने एकूण 77 ग्रॅम. 280m, अंदाजे रु. 539,000, आणि चांदी एकूण 253 ग्रॅम. अंदाजे किंमत 20,240 रुपये, आणि 1200 रुपये रोख, तसेच अंदाजे 6,51,240 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणाचा छडा लावून आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविलेल्या सर्व टीमच्या कार्याचे कौतुक करून सन्मानपत्रासह रोख बक्षीस देण्याची घोषणा जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश सोनावने यांनी केली आहे.