क्राईम न्युज
बनावट कागदपत्रे तयार करून खरेदी विक्री प्रकरणी सात जनांना अटक
विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
जमीनींची बनावट कागदपत्रे तयार करून कुणाची तर जमीन दुसऱ्याला विक्री केल्याचे अनेक प्रकरणे उघडकीस आले आहेत
विजयपूर सीईएन क्राइम पोलिसांनी दोन प्रकरणात सात जनांना अटक केली आहे.
शहरातील केएचबी काॅलनी निवासी नारायण शिवराम साठे आणि अनिल सिद्धप्पा
मोगली यांच्या संयुक्त मालकीचे
सेव्हे नं 144/2 मध्ये 6.15.जमीन इसाक मोसा निपाणी यास रु 20 लाखास विक्री करून फसवणूक करण्यात आली होते.
याविरुद्ध नारायण साठे त्यांचा मुलगा अनिल साठे याने विजयपूर आदर्श नगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीसांनी तपास करून
बापू धोंडिबा क्षीरसागर प्रकाश सुखदेव अहोळ्ळी
दादा विलास अहोळ्ळी, गणेश देवेंद्र देवकुळे
योगेश चंद्रकांत कांबळे व भरत सत्तप्पा कांबळे यांना पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 3.50 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणात बनावट कागदपत्रे , आधार कार्ड बनविणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे.
*आणखी एका प्रकरणात एकास अटक*
तिकोटा तालुक्यातील तोरवी गावातील १.३६ एकर जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार करून मारुती नारायणकर, 25 लाखांची विक्री केल्याप्रकरणी आणखी एक प्रमुख आरोपी सुभाष बाबूशा सुळ्ळी ऊर्फ माने यास
पोलिसांनी अटक केली आहे
या प्रकरणात आधीच पाच आरोपींना अटक करण्यात आली होती
पोलिसांनी त्याच्याकडून 21 लाख रुपये जप्त क
करण्यात आले असल्याचे जिल्हा पोलिस प्रमुख ऋषिकेश सोनावणे यांनी सांगितले.