सोनार हक्क परिषद दुधनी शहराध्यक्षपदी विरभद्र पोतदार; तर उपाध्यक्षपदी लक्ष्मीकांत पोतदार
दुधनी- महाराष्ट्र राज्य सोनार हक्क परिषद दुधनी शहराध्यक्ष पदी विरभद्र पोतदार तर उपाध्यक्षपदी लक्ष्मीकांत पोतदार यांची निवड सो. ह. प. चे संस्थापक अध्यक्ष राजेशभाऊ पंडित यांनी जाहीर निवड करुन सत्कार केले व पदभार सोपवले.
यावेळी सो.ह. प. चे संस्थापक पंडित यांनी बोलताना म्हणाले की, सोनार समाजाला होणारा अन्याय, कारागीरांना होणारे अत्याचार, सुशिक्षित व बेरोजगार युवा व महिला व समाज कल्याण, शासनाचे सोयी सुविधा असे अनेक समस्या व कष्ट आपल्या सोनार बांधवाना होत आहे,म्हणून सबंध महाराष्ट्रातील सोनार एकजुटी होऊन सर्व समस्यांचे निराकरण करु त्यासाठी महाराष्ट्र राज्य सोनार हक्क परिषद तयार असल्याचे राजेशभाऊ पंडित यांनी म्हंटले.
यावेळी सोनार हक्क परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रविशंकर धर्माधिकारी, सरचिटणीस काशीनाथ पोतदार, सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक, महिला आघाडी सन्मयक सौ.माधवीताई पोतदार, युवा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संतोष दिक्षीत, राज्य युवा संघटक बार्शी संतोष सोनार, अक्कलकोट शहराध्यक्ष सचिन निंबाळकर व दुधनीतील सराफ सोनार व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
दुधनी शहर सोनार हक्क परिषदेचे पदाधिकारी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला.
1) अध्यक्ष- विरभद्र पोतदार
2) उपाध्यक्ष- लक्ष्मीकांत पोतदार
3) कार्याध्यक्ष- रमेश पोतदार
4) सचिव- दत्तात्रय पोतदार
5) खजिनदार- गुरुशांत हावशेट्टी
6) संघटक- शरणबसप्पा शिलवंत
7) प्रसिद्धी प्रमुख- रवि पोतदार
8) संपर्क प्रमुख- संतोष पोतदार
9) जिल्हा कार्यकारिणी सदस्य- शांतप्पा तोळणुर
10) सदस्य- गुरुशांत पत्थार
11) सदस्य- सिध्दाराम हिरेमठ
12) शहर युवा अध्यक्ष- गणेश सुतार
13) ज्येष्ठ मार्गदर्शक- काळप्पा पोतदार