बेकायदेशीर रेशन तांदूळ व वाहन जप्त, एकास अटक
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील कोळ्ळूर्गी गावाजवळ एका वाहनातून तांदळाची अवैध वाहतूक करताना पोलीस आणि अन्न निरीक्षकांनी धाड टाकून तांदूळ जप्त करण्यात आली आहे
या प्रकरणी अबुकर लालसाब जमादार यास अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 500 किलो 57 ग्रॅम रु 16 हजार 153 किमतीचे रेशन तांदूळ आणि रु 50 हजार किमतीचे वाहन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी होर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी अन्न निरीक्षक परमानंद हुगार, पीएसआय सीताराम, पोलिस कर्मचारी पी बी बिरादर, एस.एम.हुनश्याळ उपस्थित होते.