संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे:- केंद्र प्रमुख सुरेश शटगार
दुधनी केंद्र शिक्षण परिषद संपन्न
अक्कलकोट/ प्रतिनिधी- विश्वनाथ राठोड
जुलै २०२४ शिक्षण परिषद श्री एस.जी.परमशेट्टी हायस्कूल दुधनी येथे जि.प.प्राथ.कन्नड मुली शाळेच्या संयोजकाने संपन्न झाली प्रथम सावित्रीबाई फुले प्रतिमेचे पुजन गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे यांच्या हस्ते तर कन्नड मुली यांच्या हस्ते आदर्श परिपाठ व स्वागत गीत सादर केले
यावेळी शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्र प्रमुख सुरेश शटगार होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे व गट साधन समन्वय गणेश अंबूरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली
यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी आरबाळे यांनी बोलताना म्हणाले आयुष्यात की जीवन जगत असताना
व आपले कर्तव्य बजावत असताना संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे,आपले कर्मच आपल्याला तारतील ईश्वर आईवडील गुरू व आपले कर्म हेच जीवन अशा अनेक मार्मिक भाष्य केले श्री अंबूरे यांनी अध्ययन स्थर अध्ययन निश्चिती गुणवत्ता अनेक शिष्यवृत्ती योजना याबाबत सखोल अशी माहिती दिली.
यावेळी नवीन पोर्टल व जिल्हा अंतर्गत बदली होऊन आलेल्या सर्व शिक्षक बांधवांचे यथोचित सत्कार सन्मान करण्यात आले
यावेळी आभार व्यक्त करताना संतोष जोगदे म्हणाले की, तुम्ही प्रेमाने पन्नास काम सांगा आम्ही शंभर काम करू व आपण दिलेल्या आदेशाचे पालन शंभर टक्के करू असे आश्वासन दिले.
यावेळी श्री एस जी परमशेट्टी हायस्कूलचे मुख्याध्यापक रेवणसिध्द आलिगावे, म्हेत्रे प्रशालेचे शिक्षक, केंद्रातील जेष्ठ मुख्याध्यापक व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते सुत्रसंचालन श्री चौधरी यांनी केले.
एकंदरीत शिक्षण परिषद आनंदी वातावरणात पार पडले.