महिलांनी आर्थिक सक्षम व्हावे :- नागम्मा पाटील
अक्कलकोट-
अक्कलकोट तालुक्यातील कल्लाप्पावाडी गावात महिला स्वयंसहायता बचत गटाचे मेळावा साठी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा दुधनी शाखा अधिकारी कृष्णा यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी बचत गटातील बचत गट महिलाच्या वतीने शाखाधिकारी स्वागत सत्कार करून मेळावा सुरुवात करण्यात आले.
बचत मेळाव मध्ये शाखा अधिकारी कृष्णा यांनी सांगितले बचत गटावर काढलेले लोन कसे फेडावे बचत गटास किती टक्केने लोन मिळतो, लोन विषयी संपूर्ण माहिती सांगितले . त्या मेळावा मध्ये नागम्मा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की देशाच्या राष्ट्रपती पदापासून ते गावच्या सरपंच पदापर्यंत सर्व क्षेत्रात महिला अत्यंत चांगले काम करत आहे, आधीच्या काळात चूल आणि मूल सोडून महिलांना काहीच माहित नव्हते. आज सर्व क्षेत्रात महिला कार्यरत आहे. बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला उद्योग व्यवसायात यशस्वी झालेले आहेत. बचत गटातील महिला सकारात्मक विचाराने वेगवेगळ्या उद्योग व्यवसाय कडे वळले पाहिजे ,महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम व्हावे ही काळाची गरज आहे. असे म्हणाले या वेळी सीआरपी कोळी एस डी व लक्ष्मीबाई औराद आपल्या मनोगत व्यक्त केले. बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या होणारे फायदे महिलांना समजून सांगितले.
यावेळी कल्लाप्पावाडी गावातील महिला स्वयं सहायता बचत गटाची महिला पदाधिकारी उपस्थित होते. तसेच बँक कर्मचारी गुरु गावातील समाजसेवक दिलीप यमगर, मल्लिकार्जुन पाटील, दत्ता कोळी, श्रीशैल जालवादी ,नागनाथ सोनकर, काशिनाथ इंडे, दत्तात्रय डोणे, भीमाशंकर कोळी, धनंजय जानकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू डोणे यांनी केले, काशिनाथ इंडे आभार मानले.