सिन्नुर ग्रामपंचायतीला दुरुपयोगी निधी देणे बंद करावे- जगन्नाथ जाधव
दुधनी- येथील गांधीनगर तांडा, सोळसे तांडा व भिमनगर हे तिन्ही भाग मिळुन स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून 30 जुन 2023रोजी अस्तित्वात आला आहे. सध्या शासनाने प्रशासक व ग्रामसेवक म्हणून नेमणूक केली असताना देखील, सिन्नुरचे सरपंच व ग्रामसेवक मिळुन भ्रष्टाचार करुन निधी गोळा करण्याचे काम करत आहेत, तसेच सिन्नुर व भिमनगरामध्ये त्या निधीचा दुरुपयोग सरपंच यांनी करुन घेत आहे.
भिमनगर, गांधी नगर व सोळसे तांडा हे स्वतंत्र ग्रामपंचायत होऊन एक वर्ष झाले असुन योग्य पध्दतीचा निधी स्वतंत्र ग्रामपंचायतीला द्यावे व दुरुपयोगी निधी देणे बंद करावे असे आश्वासन जिल्हाधिकारी व ग्रामपंचायतीचे गटविकास अधिकारी यांना भाजपाचे बंजारा समाज तालुका अध्यक्ष जगन्नाथ जाधव यांनी सोलापूर 24तास न्युज चॅनेल च्या माध्यमाद्वारे दिले. तसेच असले दुरुपयोगी निधी देणे बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील जाधव यांनी केले आहे.
यावेळी भिमनगरातील सातलिंग निंबाळ, सैदप्पा झळक्की, गौतम झळक्की, शिवा गायकवाड, भिमा झळक्की, खाजप्पा शिंगे, भिमाशंकर झळक्की, लक्ष्मण रेवुर, सैदप्पा सरसंबी, गुरु गायकवाड, मदलप्पा यन्नुर आदी उपस्थित होते.