Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

आषाढी एकादशी निमित्त काळेगाव येथे भगच्च कार्यक्रमांचे आयोजन

Responsive Ad Here

 आषाढी एकादशी निमित्त काळेगाव येथे भगच्च कार्यक्रमांचे आयोजन 



अक्कलकोट/ प्रतिनिधी- प्रविणकुमार बाबर 

                 अक्कलकोट तालुक्यातील काळेगाव येथे आषाढी एकादशी निमित्ताने हरिपाठ, भव्य कीर्तन सोहळा व जुगलबंदी भारूड असे अनेक विविध कार्यक्रमाचे आयोजन मंदिर समिती व गावकऱ्याकडून करण्यात आले असून, गावातील राहिवासी कै कुसुमबाई चव्हाण यांच्या स्व खर्चातून विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारण्यात आले असून, यंदाचे हे 9 वे वर्ष असून दरवर्षी आषाढी एकादशी ला संपूर्ण पंचक्रोशीतील भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन केले जाते, दरम्यान बुधवारी दि 17 रोजी पहाटे 4 वाजता पांडुरंगाच्या मूर्तीस अभिषेक, महापूजा व नंतर दिवसभर महाप्रसाद वाटप त्यानंतर सायंकाळी 5ते 6पर्यंत हरिपाठ, संध्याकाळी 8.30ते 11.30 पर्यत ह भ प बाल कीर्तनकार माऊली महाराज जाहूरकर यांचे भव्य कीर्तन सेवा होणार आहे. कीर्तन सेवेनंतर भारूडकार अण्णा चव्हाण व संदीप मोहिते यांचे रात्रभर भरूडाचे कार्यक्रम आहे.

तसेच गुरुवारी सकाळी 7ते सायंकाळी 6 पर्यंत पुन्हा महाप्रसादाचे आयोजन केले आहे. 

           या अशा अनेक भरगच्च कार्यक्रमाचा लाभ काळेगाव-सांगवी सह पंचक्रोशीतील नागरिक व भाविक भक्तांनी घ्यावा असे आव्हान मंदिर समिती तर्फे करण्यात येत आहे.