आलमट्टी धरण संपूर्ण भरले 123-81 टिएमसी पाणी साठा संग्रह
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
पश्र्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या मूसळधार पाऊसामुळे विजयपूर जिल्ह्यातील आलमट्टी जलाशयात गेल्या 38 दिवसात लालबहादूर शास्त्री जलाशयात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आल्यामुळे आलमट्टी धरण संपूर्ण पणे भरले असून शेतकऱ्यांमध्ये मंद हास्य निर्माण झाला आहे
आज रविवारी रोजी 519-60 मीटर उंचीच्या आलमट्टी जलाशयात 519-60 मीटर पर्यंत पाणी संग्रह झाले असून 123-081टिएमसी पाणी संग्रह करण्याची क्षमता असलेल्या आलमट्टी जलाशयात 123-81पाणी साठा आहे. या वर्षात पहिल्यांदाच जलाशय संपूर्ण पणे भरले आहे.
आलमट्टी धरणात 17 हजार 548 क्यूसेक पाणी वाहून येत असून 15 हजार क्यूसेक पाणी जलाशय च्या विद्यृत उत्पादन घटकात वीज निर्मिती साठी सोडण्यात येत आहे.
या हंगामात आलमट्टी धरणात 566 टिएमसी पाणी वाहत आलेले असून जलाशयातून 456 टिएमसी पाणी कृष्णा नदीच्या पात्रात सोडण्यात आले आहे. जलाशय दर वर्षी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण भरले असते मात्र पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने संपूर्ण पणे पाणी साठा करण्यात आले नव्हते. दरवर्षी दुष्काळी परिस्थिती अनुभव घेणारा या भागातील शेतकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .
लवकरच मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्याहस्ते गंगापूजन करण्यात येणार असल्याची माहिती कृष्णा जल निगम एम.डी. के.पी. मोहनराजू यांनी दिली आहे.