Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

22 डिसेंबर रोजी विजयपूरात हेरिटेज रनचे आयोजन - डॉ. महांतेश बिरादार

Responsive Ad Here



 22 डिसेंबर रोजी विजयपूरात हेरिटेज रनचे आयोजन - डॉ. महांतेश बिरादार




विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

  डिसेंबर 22 रोजी विजयपूर शहरात आयोजित केला जाणारा वृक्षथान हेरिटेज रन 2024 कार्यक्रम गेल्या वर्षा पेक्षाही अत्युत्तमपणे आयोजित करण्याचे सर्व प्रयत्न केले गेलेले असून सर्वप्रकारची तयारी सुरू असलेल्याची माहिती डॉक्टर महांतेश बिरादार यांनी दिली. 

महांतेश बिरादर यांनी शहरात आयोजित केलेल्या तयारीचा आढावा बैठकीत बोलताना दिली या बैठकीत सहभागी झालेल्या कोअर कमिटीच्या सदस्यांनी आतापर्यंत केलेल्या तयारीची माहिती बैठकीत दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, गेल्या वेळी या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यावेळी या शर्यतीचे आयोजन आणखी चांगले केले जात आहे.

विजयपुर शहरातील गोलगुंबज सुंदरेश्वर मंदिर, आनंद महल, चर्च, नरसिंह मंदिर, बाराकमान इब्राहिम रोजा, सैनिक स्कूल, 770 अमरगणधीश्वर लिंग स्मारक, ज्ञान योगाश्रम,  शिवमंदिर आदी ऐतिहासिक स्थळांसमोरुन ही शर्यत जाणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना या ठिकाणांचे महत्त्व  कळावे हा यामागचा उद्देश असून,प्रायोजक या कार्यक्रमाला प्रायोजित करण्यास उत्सुक आहेत. तसेच यावेळी हेरिटेज रन कोअर कमिटीच्या प्रत्येक समितीने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आधीच नियोजन केले आहे. गेल्या वेळी 10 हजार धावपटूंनी सहभाग घेतला होता. यावेळी 15 हजार धावपटू सहभागी होण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले. इतर शहरातून येणाऱ्या धावपटूंना विजयपूरच्या ऐतिहासिक स्थळांची ओळख करून देण्याबरोबरच सवलतीच्या दरात राहण्यासाठी हॉटेल्सची व्यवस्था करून दिली जाणार आहे. असे त्यांनी सांगितले.  सांस्कृतिक वारसा दर्शवणाऱ्या कला पथकांच्या प्रदर्शनाची व

याआधीच शेकडो धावपटूंनी ऑनलाइन नाव नोंदणी केली असून  चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक प्रचार केला जात आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी बॅनर लावण्यात येत असल्याची माहिती नोंदणी समितीच्या सदस्यांनी बैठकीत दिली. मुरुगेश पट्टनशेट्टी, शिवनगौडा पाटील, संतोष औरसंग, गुरुशांत कापसे, अप्पू भैरगोंड, अमित बिरादर, प्रदीप कुंभार, नवीद नागठाण, समीर बाळगार, शिवानंद यरनाळ, सचिन पाटील, प्रवीण चौराश, डी. के. तावसे, जगदीश पाटील, रिता कनमडी, वीणा देशपांडे, महेश व्ही. शटगर, संदीप व इतर उपस्थित होते.