Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

सोनार हक्क परिषदेचे मैंदर्गी शहराध्यक्ष पदी श्रीधर पोतदार

Responsive Ad Here

सोनार हक्क परिषदेचे मैंदर्गी शहराध्यक्ष पदी श्रीधर पोतदार 




अक्कलकोट / प्रतिनिधी- चंद्रकांत वेदपाठक 

       सोनार हक्क परिषदेची मैंदर्गी येथे  शाखा स्थापन करण्यात आली असून शहर अध्यक्ष पदी श्रीधर इराप्पा पोतदार, पहिले उपाध्यक्ष पदी अशोक सदाशिव  सोनार, दुसरे उपाध्यक्ष पदी अशोक मारुती लोहार तर कार्याध्यक्ष पदी मल्लिनाथ विठ्ठल चाकुर, सेक्रेटरी पदी श्रीशैल इरन्ना पोतदार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

     मैंदर्गी येथील दुधनी बायपास रस्त्यावरील श्री मोनेश्वर मंदिरात  सोनार समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती त्याबैठकीच्या अध्यक्ष स्थानी सोनार हक्क परिषदेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दादा वेदपाठक होते. 

    प्रमुख अतिथी म्हणून सोनार हक्क परिषदचे प्रदेश अध्यक्ष रविशंकर धर्माधिकारी, व प्रदेश सरचिटणीस काशिनाथ पोतदार हे होते. 

     यावेळी मैंदर्गी सोनार हक्क परिषदेच्या युवा आघाडी अध्यक्षपदी आनंद मल्लिनाथ पोतदार तर उपाध्यक्ष पदी आनंद पद्माकर दीक्षित तर खजिनदार पदी सुरेश महारुद्रप्पा चाकुर  यांची निवड करण्यात आली तर मैदर्गी सोनार हक्क परिषदेचे मार्गदर्शक पदी ज्येष्ठ सदस्य भीमाशंकर इरन्ना लोहार यांची तर  सदस्य पदी तुकाराम गंगाधर सुतार, उमेश शंकर सुतार, श्रीकांत पुंडलिक लोहार, श्रीशैल भीमाशंकर लोहार, विजय इरन्ना लोहार, चंद्रकांत भीमाशंकर लोहार तर भाऊभवानीअप्पा लक्ष्मण पोतदार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

    या प्रसंगी सोनार हक्क परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अमोल अशोक पोतदार , अक्कलकोट तालुका अध्यक्ष दीपक अण्णाराव पोतदार, शहर अध्यक्ष सचिन प्रकाश निंबाळकर तर अक्कलकोट तालुका सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष तथा परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल रामचंद्र वेदपाठक, काशिनाथ विठ्ठल पोतदार सर आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.