Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

श्री समर्थ सद्गुरु गणपतराव महाराजांचा जन्मोत्सव सप्ताह

Responsive Ad Here



 कन्नुर येथील शांतिकुटीर आश्रमात दि. 30 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर पर्यंत

श्री समर्थ सद्गुरु गणपतराव महाराजांचा जन्मोत्सव सप्ताह



विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

विजयपुर तालुक्यातील सुक्षेत्र कन्नुर शांतिकुटीर येथे 30 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान श्री गणपतराव महाराजांचा 116 वा जयंती सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती शांतिकुटीरचे ज्येष्ठ सदस्य श्री. रमेश कन्नुर यांनी दिली. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, आध्यात्मिक साधनेसाठी कन्नुरग्रामी शांतिकुटीर आश्रम बसविला गेला. आध्यात्मिक  साधने बरोबरच सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने श्री गणपतराव महाराज यांनी सुराज्य संस्थेची स्थापना केली. या संस्थेद्वारे अनेक सामाजिक सुधारणा आणि विकास मोठ्या प्रमाणात केला जात आहे. 


कर्नाटक आणि महाराष्ट्रात अनेक शिष्य असलेले समर्थ सद्गुरु गणपतराव महाराज यांचा बालपणापासूनच अध्यात्माकडे कल होता. वयाच्या ९४ व्या वर्षी सुलभ आत्मज्ञान हा महाकाय ग्रंथ तयार करण्याचे श्रेय त्यांना जाते. श्रुती शास्त्रांमध्येही वर्णन करणे कठीण असलेला सर्वोच्च वेदांत त्यांनी अतिशय  सोप्या भाषेत स्पष्ट केला आहे. अशा  या महान सद्गुरुंचा जयंती सप्ताह मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचा निर्णय शांतिकुटीर विश्वस्त समितीने घेतला आहे.

शांतिकुटीर ट्रस्टचे अध्यक्ष गोविंदलाल बाहेती, विश्वस्त रमेश कुलकर्णी (कन्नुर) यांनी   पत्रकार परिषद घेऊन शांतिकुटीर येथे नऊ दिवस चालणाऱ्या साप्ताहिक कार्यक्रमांची माहिती दिली.



30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता दासबोध ग्रंथवाचनाने सप्ताहास प्रारंभ होईल. या सप्ताहाचा उद्घाटन सोहळा विजयपुर ज्ञानयोगाश्रमाचे श्री बसवलिंग महास्वामी, षण्मुखारुध मठाचे श्री अभिनव सिद्धारुद्ध महास्वामी, कन्नूर गुरु मठाचे श्री सोमनाथ शिवाचार्य यांचे पावन हस्ते होणार आहे. सायंकाळी ५ वाजता सुरतचे स्वामी सवितानंदजी यांचे प्रवचन होईल. त्यानंतर सांगली येथील कीर्तनकारांचे कीर्तन होईल.


31 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता डॉ. प्रभूसारंगदेव शिवाचार्य आणि बंगळुरू येथील डॉ. आरती ही.बी. यांची प्रवचने होतील. सायंकाळी ५ वाजता बंगलोर बेलीमठ येथील श्री शिवानुभव चरामूर्ती शिवरुद्र महास्वामी प्रवचन देतील.


1 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता गदगचे जगद्गुरु श्री सदाशिवानंद महास्वामी, मथूरचे श्री रामनारायण अवधानी यांची प्रवचने होतील.‌ या कार्यक्रमास डॉ. तेजस्विनी अनंतकुमार, बंगळुरू उपस्थित राहणार आहेत. माणिकनगरचे श्री ज्ञानराज माणिकप्रभू महाराज यांचे सायंकाळी 5 वाजता प्रवचन होणार आहे. सायंकाळी 6.30 वाजता स्तोत्रिगण - समालोचन कार्यक्रम  संपन्न होईल.


सोमवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता परमपूज्य विश्वनाथ चक्रवर्ती स्वामीजी, आंगडी आणि परमपूज्य स्वामी मंगलानाथानंदजी, मादीहळ्ळी यांची प्रवचने होणार असून सायंकाळी पाच वाजता पूज्य मुरलीभैय्या, जाजू इचलकरंजी आणि परम आदरणीय श्री विवेक सबनीस, कराड यांच्या प्रवचनांचां लाभ श्रोत्यास मिळणार आहे सायंकाळी साडेसहा वाजता कर्नाटक कलाश्री चे श्री एन के मोहनकुमार, तुमकूर यांची हरिकथा होणार आहे.


3 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरबानचे श्री गुरुदेव समर्थ शिवानंद स्वामी, केरेकाईचे विद्वान उमाकांत भट, आळंदीचे श्री शंकर शास्त्री यांची अमृतवाणी ऐकावयास मिळणार आहे. सायंकाळी 5 वाजता डॉ. विजयालक्ष्मी बाळेकुंद्री यांचे प्रवचन होणार आहे.


4 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता हेब्बल्लीचे श्री दत्तावधूत महाराज, श्री मोहनबुवा रामदासी व सायंकाळी 5 वाजता चिक्कोडीचे श्री चिद्घनानंद महास्वामी प्रवचन देणार आहेत. 


दि. 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता सज्जनगडचे श्री योगेशबुवा रामदासी, हुबळीचे श्री स्वामी चिद्रूपानंद स्वामीजी, सिंदगीचे श्री दत्ताप्पय्या स्वामीजी प्रवचने देणार आहेत.

सायंकाळी 5 वाजता श्री गणपतराव महाराज आध्यात्मिक सेवा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. 


दि. 6 रोजी सकाळी 10 वाजता पुण्याचे श्रीचारुदत्त आफळे, बागलकोटचे श्री कृष्णानंद शरनरु यांची तर सायंकाळी 5 वाजता बिदरचे डॉ. शिवकुमार स्वामीजींची प्रवचने होणार  आहेत.


दि. 7 रोजी सकाळी 6 वाजता श्री समर्थ सद्गुरुंच्या  कन्नुर गावातील जन्मस्थानापासून शांतिकुटीरपर्यंत विविध वाद्यांच्या गजरात रथ व पालखी सोहळ्याची भव्य मिरवणूक निघणार आहे. 10.30 वाजता भंडारकवठेचे श्री कल्लाप्पा महाराज, विजयपूरचे श्री अभिनव सिद्धरुद्ध स्वामीजी, संगमेश, पुण्याचे अनंतराव (बाबण्णा) कुलकर्णी, मडुराचे गणेश नायक, शांतिकुटीरचे श्रीकृष्ण संपगवांकर यांची प्रवचने संपन्न  होतील. त्याच दिवशी दासबोध ग्रंथसमाप्ती आणि पुष्पवृष्टी होईल.

शांतिकुटीरात बांधलेल्या नव्या विस्तारित भक्तनिवासाचे उद्घाटन, स्मृतिसदन व ध्यानमंदिराचे लोकार्पण, शांतिकुटीर संदेशाच्या विशेषांकाचे प्रकाशन, श्री गणपतराव महाराजांच्या यशस्वी जीवनाच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन,  250 ऑडिओचे पुन: सादरीकरण, सद्गुरु उवाच कृतीचे प्रकाशन, ब्रह्मस्वरूपानुसंधान ऑडिओ बुक प्रकाशन, शांतिकुटीर परंपरेची माहिती देणाऱ्या संहितापरंपरा नावाच्या माहितीपुस्तिकेचे प्रकाशन, गणपतराव महाराजांनी संपादित केलेल्या अष्टावक्र गीता आणि नवनीत या ध्वनीग्रंथांचे प्रकाशन होणार आहे.


सप्ताहाचा एक भाग म्हणून दररोज संध्याकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या सप्ताहात कर्नाटक आणि महाराष्ट्रातील विविध भागातून दहा हजारांहून अधिक भाविक सहभागी होण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.


पत्रकार परिषदेत आश्रमाचे विश्वस्त डॉ.सतीश कन्नुर, सतीश तिकोटी, श्रीनिवास बाहेती, श्रीकृष्ण संपगावरकर उपस्थित होते.