Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

बेलापूरमध्ये रंगला, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा

Responsive Ad Here

  बेलापूरमध्ये रंगला, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा                                               

 

सिने कलावंतांच्या उपस्थिती ने आणली कार्यक्रमात रंगत



नवी मुंबई/प्रतिनिधी- सुरेश पोटे 

नवी मुंबई सीबीडी बेलापूर मधील मँगो गार्डन जेष्ठ नागरिक संघातील जेष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा नुकताच बेलापूर मध्ये संपन्न झाला.यावेळी बेलापूर मधील, अडव्होकेट आणि सॉलिसीटर्स लेवी रुबेन्स यांच्या वतीने, एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन बेलापूर मधील होटेल, ग्रँड 51 मध्ये करण्यात आले होते. सर्व जेष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

मँगो गार्डन जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा लता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सिनेस्टार गुलशन ग्रोव्हर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, या कार्यक्रमात महाभारत मालिकेतील अर्जुन फिरोज खान, बलराम  सागर सोलंकी, अभिनेत्री पम्मी मोटन, एजाज खान,शहजाद खान आदी कलावंतानी हजेरी लावली होती.  सिनेकलावंतांच्या हस्ते सर्व जेष्ठ नागरिकांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. 

यावेळी उपस्थित कलाकारांनी आपल्या गाण्याच्या तालावर सर्वाना ठेका धरायला लावला. सर्व जेष्ठ नागरिकांनी या कलाकारांच्या तालावर ठेका धरत कार्यक्रमात एकच रंगत आणली. या सन्मान सोहळ्यात स्वतः लेवी रूबेन यांनी आपल्या सुमधुर आवाजात विविध गाणी गात, उपस्थितांचे मनोरंजन केले.  समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणारे लेवी रूबेन नेहमी सर्वाना मदत करायला पुढे असतात. जेष्ठ नागरिकांच्या आयुष्यात एक आंनदाचा क्षण देता आला याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सचिव श्री सुरेश पोटे यांचा व जेष्ठ पत्रकार विश्वरथ  नायर यांचा ही जेष्ठ पत्रकार म्हणून विशेष सन्मान करण्यात आला.

जेष्ठ नागरिक म्हणजे घरातील दुर्लक्षित व्यक्ती म्हणूंन त्यांच्या कडे पाहिले जाते. मात्र आत्ता अश्या प्रकारे भव्य सन्मान झाल्याने आपण भारावून गेल्याची प्रतिक्रिया सर्वच जेष्ठ नागरिकांनी यावेळी व्यक्त केली. तर जेष्ठ नागरिकांना सन्मानाची भावना वाढीस लागावी यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आल्याचे  मँगो गार्डन ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष लता पवार यांनी सांगितले.