Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

गुहागर शहराला वळसा घालून होणार सागरी महामार्ग

Responsive Ad Here

 गुहागर शहराला वळसा घालून होणार सागरी महामार्ग


👉 *निवासी भाग वाचणार, गुहागर-विजापूर प्रलंबित मार्गाचेही दीड महिन्यात काम सुरु होणार, डाँ. विनय नातूंच्या प्रयत्नांना यश* 


*प्रशांत चव्हाण / रत्नागिरी* 


प्रस्तावित सागरी मार्ग हा गुहागर शहराला वळसा मारुन जाणार असल्याने शहरातील निवासी भाग वाचणार आहेच शिवाय गुहागर-विजापूर मार्गाला तो जोडणार आहे. त्यामुळे अंतर कमी होऊन भूसंपादनाचे पैसेही कमी होणार आहेत. त्यामुळे हा मार्ग पर्यटनदृष्ट्या अधिक फायदेशीर असल्याचे गुहागरचे माजी आमदार डाँ. विनय नातू हे पटवून देण्यास यशस्वी ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर ऱविवारी सकाळी रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली असून यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे डाँ. नातू यांनी सांगितले.


सागरी महामार्गाच्या गुहागर तालुक्यातील रस्त्याचे पुर्नसर्वेक्षण होण्यासाठी डाँ. नातू यांनी रविंद्र चव्हाण यांना मंत्रालयात बैठक घेण्यास विनंती केली होती. गुहागर तालुक्यामध्ये सागरी महामार्ग जात असताना गुहागर शहराच्या निवासी भागातून हा महामार्ग जात आहे. त्याऐवजी गुहागर शहरातील हद्दीतूनच पूर्व बाजूकडे जाऊन गुहागरमधील वाकी पिंपळवट गावातून शासकीय विश्रामधाम, न्यायालय यांच्या जवळून गुहागर - विजापूर राष्ट्रीय महामार्गाला मिळाल्यास अत्यंत चांगल्या पद्धतीचा महामार्ग होईल असे सूचित केले होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ ई गुहागर -विजापूर या महामार्गाच्या कामकाजाबद्दल अनेक विषय प्रलंबित आहेत. यामध्ये गुहागर तालुक्यातील  शृंगारतळी  या गावांमधील गटारांचे अपूर्ण बांधकाम, गुहागर शहरातील शून्य किलोमीटर पासून सुरु होणारे काम अद्यापही सुरू झालेले नाही. मार्गताम्हाने गावातील ७०० मीटरचे काम अद्यापही सुरू झालेले नाही, शृंगारतळी येथील पूल बांधकाम कामाची सुरुवात झालेली नाही, जोड रस्त्याचे अप्रोच रोड योग्य दर्जाचे बनविलेले नाहीत, आवश्यक ते बस थांबे पुन्हा उभारणे, चिपळूण तालुका खेर्डी गावांमधील गटारांचे बांधकाम करणे, रामपूर चिपळूण या कामाची अद्याप सुरुवात झालेली नाही, रत्नागिरी व सातारा जिल्ह्यातील तालुका चिपळूण पिंपळी ते तालुका पाटण हेळवाक पर्यंतच्या कामाची अद्यापही निविदा कार्यवाही करण्यात आलेली नाही.


चिपळूण शहरातील मिसिंग लिंक, चिपळूण मधील दोन बायपास रोड द्वारे जोडण्यास मान्यता देणे या विविध प्रलंबित विषय नातू यांनी बैठकीमध्ये सविस्तर चर्चा केल्यानंतर गुहागर तालुक्यातील सागरी महामार्गाच्या रस्त्याचे पुनर् सर्वेक्षण करण्याचे आदेश मंत्री महोदयांनी दिले. यावेळी रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष श्री कीरण खरे, गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, चिपळूण तालुकाअध्यक्ष अजित थरवळ,चिपळूण माजी तालुकाध्यक्ष सतीश मोरे, खेड तालुका अध्यक्ष किशोर आंब्रे ,ऋषिकेश मोरे,चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, खेर्डी उपसरपंच विनोद भुरण,जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे,गुहागर शहराध्यक्ष नरेश पवार, गुहागर नगरपंचायत गटनेते उमेश भोसले, संतोष सांगळे, संतोष मावळणकर, शहराध्यक्ष मंदार पालशेतकर,गणेश भिडे, संदीप वैद्य, माजी नगरसेविका सौ. ज्योतीताई परचुरे, दीपक परचुरे, अमरदीप परचुरे, सिद्धिविनायक जाधव, सौरभ चव्हाण, विनोद चाळके, जगदीश आंब्रे, नागेश धाडवे आदी भाजपाच्या आधी प्रमुख पदाधिकाऱ्यांसहित मान. सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग, अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई,मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ रत्नागिरी, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ रत्नागिरी, मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग सीबीडी बेलापूर,उपविभागीय अधिकारी चिपळूण, उपविभागीय अधिकारी महसूल पाटण - जिल्हा सातारा, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी आदी मान्यवर अधिकारी उपस्थित होते.