दुधनी सराफ -सोनार असोसिएशन व सोनार हक्क परिषदेतर्फे निषेध
दुधनी सराफ व्यापाराचा अपहरण
अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात दिले निवेदन पञ
अक्कलकोट- दुधनी येथील सराफ व्यापारी शरणबसप्पा गुरुबसप्पा शिलवंत यांना काल सोमवारी रात्री साडेसात ते आठ दरम्यान आम्ही कलबुर्गी पोलिस आहोत म्हणत बळजबरीने अपहरण केल्याची माहिती मुलगा विनायक शरणबसप्पा शिलवंत यांनी दुधनी सराफ-सोनार असोसिएशनचे अध्यक्ष गुरुशांत हावशेट्टी यांना सांगितले, त्यानंर सर्व सराफ-सोनार व्यापारी एकञ होऊन काल रात्री कलबुर्गी पोलिसांची भेट घेतली. तेथील पोलिस अधिकारी यांनी शिलवंत यांनी चोरीचे सोने घेतल्या चे सांगितले. नंतर दुधनीतील व्यापारी शिलवंत यांना पुर्ण माहिती विचारले असता शिलवंत म्हणाले की मी कुठलाही सोने घेतले नाही व चोराला सुध्दा ओळखत नाही मला दुकानातून जबरदस्तीने इथे आणल्याची सांगितले. नंतर तेथील वरिष्ठ अधिकारी सोबत संपर्क साधल्यास त्यांनी काही तरी तडजोड करुन तुमच्या माणसाला घेऊन जावा असे म्हणाले.
आज दुसर्या दिवशी सर्व व्यापारी व सोनार हक्क परिषदेचे पदाधिकारी यांनी मिळून अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात निवेदन दिले.याबाबत सोनार हक्क परिषदेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांनी म्हणाले की कर्नाटक पोलिसांनी दुधनीतील स्थानिक पोलिस किंवा घरच्या सदस्यांना न सांगता अथवा कुठलाही माहिती न देता एका व्यक्तीला घेऊन जाणे हे कायद्याच्या नियम बाह्य असल्याचे वेदपाठक यांनी म्हणाले.
कर्नाटक पोलिसांची दादागिरी- गुरुशांत हावशेट्टी
कर्नाटक पोलिस हे मनमानी कधीही कोणालाही पकडुन नेतात दिड वर्षापुर्वी एक सराफ दोन सोनार व एक खाटिक यांना दमदाटी देऊन पैसे उरकून काढले आहेत, आम्ही ह्यांचे ञास किती दिवस सहन करणार? कर्नाटक पोलिसांची दादागिरी ह्या पुढे खपवून घेणार नाही असे हावशेट्टी यांनी सांगितले.
महाराष्ट्र पोलिस सदैव तुमच्या सोबत- राज कोळी
कर्नाटक पोलिसांनी आम्हाला कुठलाही प्रकारचे माहिती न देता शिलवंत यांना कायद्याचे उल्लंघन करुन नेले ह्या बाबत वरिष्ठांशी चर्चा करुन योग्य ती कारवाई करणार असल्याचे हवालदार राज कोळी यांनी सांगितले.
यावेळी सोनार हक्क परिषदेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक, अक्कलकोट तालुका अध्यक्ष दिपक पोतदार, शहराध्यक्ष सचिन निंबाळकर,दुधनी शहराध्यक्ष विरभद्र पोतदार, सोलापूर जिल्हा सदस्य गुरुशांत पत्थार, सराफ सोनार असोसिएशनचे अध्यक्ष गुरुशांत हावशेट्टी उपाध्यक्ष दत्ताञय पोतदार, सिध्दाराम हिरेमठ, शांतप्पा तोळणुर, संतोष पोतदार, रमेश पोतदार, लक्ष्मीकांत पोतदार, सुरेश निंबाळ,महालिंग बाहेरमठ अनिल सोनार, प्रकाश जिवाजी आदी उपस्थित होते.