निर्भया
ज्या घटना आज काल कानी येत आहेत, त्या ऐकल्यावर असे वाटते की देवाने आपल्याला ऐकण्याची क्षमताच का दिली आहे? 'लाज' ही स्वयं लाजेल अशा घटना आपण सभोवताली पाहतो, ऐकतो. 'बलात्कार' ही एक अशी घटना आहे याविषयी बोलणे ही संकोच जनक वाटते. स्त्रियांना त्यांच्या स्त्रीत्वाविषयी भय उत्पन्न झाले आहे तर काही पुरुषांना त्यांच्या पुरुषपणाची लाज वाटत आहे.आजच्या या आघाडीच्या युगात जिथे स्त्री -पुरुष समान आहेत म्हणून नारे लावले जातात, जिथे स्त्री ही पुरुषांबरोबरच घर -काम सांभाळून पुरुषाच्या आर्थिक भारावरही सहभागी होऊन सुखी संसारासाठी झटत असते. मुलांना योग्य शिक्षण मिळावे म्हणून आपल्या मुला-मुलींसाठी स्त्री रातोरात कष्ट करत असते. पण आज या पुरुषप्रधान समाजात तिची अशी अवहेलना केली जाते, कसे विसरती ही पुरुष जात की स्त्री विना तुमची निर्मिती शून्य आहे. कसे विसरतात की नऊ महिने तिने अतोनात त्रास सहन करून, आपल्या मातृत्व छायेत या लेकराला मोठे केलेले असते, आणि तेच लेकरू एखाद दिवशी मोठे होऊन तिच्या मातृत्वाचा अपमान करून, तिच्यासारख्याच एखाद्या स्त्रीच्या स्त्रीत्वाचा बली घेऊन, तिचे जीवन उध्वस्त करतो. का आठवत नाही तेव्हा त्याला त्याची माऊली? का दिसत नाही त्याला त्याची बहीण? ही कुठली मानसिक स्थिती आहे? हा कुठला रोग आहे? का त्याचे संस्कार एवढे कमकुवत आहेत? आज प्रशासनावर तर माझे प्रश्न आहेतच. परंतु इथे चूक कोणाची? त्या मनुष्यामध्ये असलेल्या दानवी प्रवृत्तीची, का त्याला वाढवणाऱ्या आई-वडिलांची, समाजाची, पोलिसांची, न्यायव्यवस्थेची
कानूनाची की प्रशासनाची?? माझ्या मते समाजातील प्रत्येक सदस्याची चूक आहे .
आज न्यायव्यवस्था बदलली पाहिजे काही कानून बदलण्याची आवश्यकता आहेत. आम्ही कानूनात्मक लढा लढण्यासाठी तयार आहोत पण तुम्ही सांगा किती दिवस आम्ही लढायचे? एक वर्ष, दोन वर्ष, पाच वर्ष,दहा वर्ष सांगा किती वर्ष?? संयमाला ही सीमा आहे.
कानूनावर विश्वास नाही असे नाही परंतु प्रक्रियेवर विश्वास नाही. या कालावधीमध्ये आरोपी जर आरोप साबित न झाल्यामुळे बाहेर जर फिरत राहिला तर तो निर्भीड बनेल व अजून अशा कितीतरी अत्याचार करण्यास तो मुक्त राहील. पोलिसांचे काय? FIR दाखल करण्यासाठी त्या मुलीच्या परिजनांना या पोलीस स्टेशन पासून त्या पोलीस स्टेशन पर्यंत चकरा घालाव्या लागतात. क्राईम झाल्यानंतर पोलीसांची गाडी शव पडताळण्यासाठी येते, यावर तत्काळ ॲक्शन होत नाही का पोलिसांना त्याचे गांभीर्यच वाटत नाही? प्रशासन! सगळ्यात मोठी जबाबदारी तर प्रशासनाची आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार खुर्चीसाठी ओढाताण करणारा हा वर्ग, ज्यांना खुर्ची दिसते पण जळत असलेला तो देह, क्रंदन करत असणारी ती माता, दिगभ्रमित झालेला तो पिता, घामाघूम झालेला तिचा भाऊ, कासावीस झालेली तिची बहीण दिसत नाही का ?
खुर्ची सांभाळणाऱ्यांना माझे काही प्रश्न आहेत, जर तिथे तुमची आई, बहीण मुलगी असली तर तुमची काय प्रक्रिया असती ?का तेव्हाही तुम्ही ॲक्शन घेण्यास एवढाच delay केला असता?? आज प्रतिपक्षा वरही माझे सवाल आहेत , परिस्थितीवरील उपायांवर चर्चा करण्या ऐवजी आढळित रूढ पक्षावर कसे आरोप करावे याची चर्चा जास्त केली जाते. का समाज स्वार्थी बनला आहे? जिथे तिथे मीडियापासून सर्वजण परिस्थितीचा फायदा घेऊन, आपला फायदा कसा करावा या विचारात आहेत. परंतु परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यावर चर्चा कुणाचीच नाही. इथे फक्त प्रशासन , कानून
न्यायव्यवस्था, पोलीस एवढेच जबाबदार नाहीत ,तर समाजही तेवढाच जबाबदार आहे. का आज हा पुरुषप्रधान समाज आपल्या पत्नीला ती रिस्पेक्ट देत नाही ज्याची ती हकदार आहे, तिला आपल्या साऱ्या खुशीला आशा -आकांक्षाला मारून जगावे लागते? घरातील ही पुरुषांची वागणूक कुठेतरी नकळत आपल्या मुलांना चुकीचे शिकवणूक देऊन जाते. आज समाजातील प्रत्येक कुटुंबातील आई-वडिलांना त्यांच्या मुलांमध्ये ही जाणीव करणे आवश्यक आहे की स्त्रियांचा सन्मान करावा. घरामध्येही तेच समानतेचे वातावरण असावे.
मंदिरात जाऊन लक्ष्मी सरस्वतीची पूजा जरूर करा परंतु त्या आधी घरातील लक्ष्मीची आराधना करा. आज ऍडव्हर्टाईसमेंट ,मीडिया मूवी, सगळ्यांवर ही माझे प्रश्न आहेत स्त्रीला फक्त सौंदर्यासाठी प्रतिबिंबित करू नका, तिचे टॅलेंट, तिची प्रतिभा तिची साधना, याचा प्रचार- प्रसार जास्त करण्यावर फोकस ठेवा. आज कानून, समाज, सगळ्यातही बदल होण्याची आवश्यकता आहे तरच मग समाजात दुसरी कुठलीही मुलगी निर्भया बनणार नाही.........
सुधा बेटगेरी(बागलकोट)
मोबाईल नंबर:6362846470