Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

दुबई आंतरराष्ट्रीय ग्लोबल विमा परिषदेत संजय मंथा करणार भारताचे प्रतिनिधित्व

Responsive Ad Here

 दुबई आंतरराष्ट्रीय ग्लोबल विमा परिषदेत संजय मंथा करणार भारताचे प्रतिनिधित्व



अक्कलकोट /प्रतिनिधी - विश्वनाथ राठोड 

दुधनी - येथील विमा प्रतिनिधी संजय बसवराज मंथा हे दुबई येथे भारतीय आयुर्विमा महामंडळ (एल आय सी) कडून आंतरराष्ट्रीय ग्लोबल विमा परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत 

           मूळचे दुधनी तालुका अक्कलकोट या ग्रामीण भागातील संजय मंथा यांनी जिद्द सचोटी,प्रामाणिकपणा, सेवा व सहकार्याचा जोरावर विमा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्थरावरील एका वर्षात तीन वेळा एम डी आर टी (अमेरिका) करुन अमेरिका चे सदस्यत्व प्राप्त केले आहे,

             दिनांक २७ ते ३० ऑगस्ट २०२४ या चार दिवसीय दुबई येथे संपन्न होणारा या आंतरराष्ट्रीय ग्लोबल संमेलनात संपूर्ण जगभरातून मोजकेच एमडीआरटी, सी ओ टी झालेले पात्र विमा प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्या निवडी बद्दल असंख्य 

 संतुष्ट विमा ग्राहक, मित्रपरिवार हितचिंतक यांच्यासह सिनियर डिव्हिजनल मॅनेजर अजय सपाटे मार्केटिंग मॅनेजर श्रीधर पठारे   सेल्स व्यवस्थापक भारत दिवे  वरिष्ठ शाखा प्रबंधक भाऊसाहेब लबडे ९५ आर शाखा व त्यांचे विमा विकास अधिकारी योगेश धर्माधिकारी सोलापूर, व दुधनी, अफजलपुर भागातील विमाधारक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून, दुबई दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या, याबद्दल संजय मंथा यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.