Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

लाडकी बहिणींना CKYC चा संकट !

Responsive Ad Here

 CKYC करण्यासाठी माणुस नाही  - श्रीकृष्णा समशेट्टी 


लाडकी बहिणींना CKYC चा संकट !


एस एम एस वर अंतिम तारीख 28 ऑगस्ट 




दुधनी- मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू झाल्यावर बॅंकांनी CKYC करुन घेण्यासाठी सांगितले मात्र महिना झाला काही लाडकी बहिणींचा CKYC मुळे पैसे जमा झाले नाहीत, तर काही लाडकी बहिणींना  तीन हजार रुपये देखील जमा झाले.

      दुधनी येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा दुधनी येथे लाडकी बहिणींची CKYC साठी रांगा लागल्या आहेत तर काही बहिणी नुसते  बॅंकला चकरा मारत आहेत ,आम्ही महिना झाले फाॅर्म भरुन आमचे CKYC कधी करणार असे प्रश्न बहिणींनी दुधनी बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा प्रबंधकांना विचारले असता, श्रीकृष्णा समशेट्टी यांनी म्हणालेत बॅंकेत कर्मचारी रजेवर आहेत, माणसे नाहीत, तुम्ही एकटेच आहात का?, बाकीचे कामे सोडून तुमचाच करत बसु का? सध्या वेळ नाही असे वेगवेगळ्या बहिणींना वेगवेगळे उत्तर दुधनी बॅंक ऑफ  महाराष्ट्र बॅंकेचे शाखा प्रबंधक श्रीकृष्णा समशेट्टी यांनी देत आहे.   

   मा. मुख्यमंत्री सर्व  लाडकी बहिणींना पैसे देणार की आम्हाला सावत्र बहिण म्हणून सोडून देणार  अशी चर्चा दुधनीतील काही बहिणींनी करत आहेत.