Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

शिवाजी महाराज सोसायटीला रु. 1 कोटी 3 लाख निव्वळ नफा

Responsive Ad Here


शिवाजी महाराज सोसायटीला रु. 1 कोटी 3 लाख निव्वळ नफा 






विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

विजयपूर  शहरात 1997 साली प्रारंभ झालेल्या  श्री शिवाजी महाराज को-ऑप.क्रेडिट सोसायटीला  मार्च 2024 अखेर रु. 1.03 कोटी निव्वळ नफा झाला असून सभासदांना 12 टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे सोसायटीचे अध्यक्ष डॉ.सदाशीव पवार यांनी सांगितले.

 शहरातील  कालिदास शिक्षण संस्थेच्या प्रांगणात  झालेल्या सोसायटीच्या 28 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अध्यक्ष डॉ. सदाशिव पवार म्हणाले , 1997 मध्ये स्थापन केलेल्या आमच्या संस्थेचे 5123 सदस्य असून, मार्च 2023-24 अखेरीस रु.3.03 कोटी शेयर भागभांडवल रु.3-49 कोटी आरक्षित निधीचे व  एकूण रु. 63-99 कोटी ठेवी आहेत सभासदांचा विश्वास दिसून येतो, त्याशिवाय सभासद अधिक ठेवी ठेवण्यासाठी  पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. 

1997 मध्ये केवळ 408 सभासदांनीच रु. 4-04  लाख भागभांडवलासह सोसायटीने

 आपला दैनंदिन व्यवसाय सुरू केला आणि आता 28 वर्षांची प्रदीर्घ सेवा करत असताना रौप्यमहोत्सवी सोहळा यशस्वीपणे साजरा केला. वर्षानुवर्षे प्रगतीच्या आलेख उंचावत असून,  अवघ्या 10 वर्षात स्वतःची सुसज्ज इमारत बांधली, विजयपूर जिल्ह्यातील अनेक जुन्या सहकारी संस्थांच्या बरोबरीने  एक प्रतिष्ठित सहकारी सोसायटी म्हणून ओळखली जात आहे.  त्याशिवाय ‘उत्तम सहकारी संघ म्हणून राज्य शासनाचा राज्य पुरस्कार मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. विविध ठेवी, आकर्षक व्याजदर, गरजेनुसार विविध प्रकारचे कर्ज अशा सेवा सुविधा देत आहोत कार्यक्षम संचालक  मंडळ आणि सदस्यांना पारदर्शक सेवा प्रदान करणारा प्रामाणिक कर्मचारीवर्ग त्याचबरोबर सदस्यांचा विश्वासामुळे सोसायटी प्रगतीपथावर असल्याचे सांगितले.

 या सभेत  शिक्षण, क्रीडा व इतर क्षेत्रात यश संपादन केलेल्यांना व सभासदांच्या गुणवंत मुलांना प्रोत्साहनपर बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

वार्षिक अहवालाचे वाचन संचालक मंडळाचे सदस्य संजय जंबुरे यांनी केले तर व्यासपीठावर  उपाध्यक्ष श्री.शंकर कणसे, संचालक मंडळाचे सदस्य बी. टी. तरसे, महादेव पवार,रवि मदभावी, भरत देवकुळे, .प्रवीण कनबुर, सरोजनी निक्काम, अंबुताई जाधव, महाव्यवस्थापक संजय जाधव, व्यवस्थापक चंद्रकांत जाधव, अंबादास चव्हाण,  कर्मचारी, पिग्मी एजंट व मोठ्या संख्येने संघाचे सदस्य उपस्थित होते.प्रास्ताविक व स्वागत ज्येष्ठ संचालक बी. टी. तसे यांनी केले विठ्ठल चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.