सोनार समाजाच्या विविध मागण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना निवेदन
सोलापूर- ओबीसी हक्क परिषद दिल्लीच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सौ. माधवी काशीनाथ पोतदार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सचिवालयात सोनार समाजाच्या विविध मागण्याची निवेदन दिले.
या निवेदनात ओबीसीची जातनिहाय जनगणना करणे, संत नरहरी सोनार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणे, ओबीसी आरक्षणास कुठेही धक्का न लावता व ओबीसी आरक्षणांने मिळालेले संवैधानिक अधिकार अबाधित ठेवुन इतर जातींना आरक्षण देणे,सुवर्णकार पेन्शन योजना सुरू करणे, सुवर्णकार अवजार योजना सुरू करणे तसेच ओबीसीतील समाजांना अॅट्राॅसेक्ट कायदा लागु करणे बाबत अशा विविध प्रकारचे मागणी मुख्यमंत्र्यांना निवेदना मार्फत दिले आहे.
तसेच ओबीसी हक्क परिषद दिल्लीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रदिप बाबुराव फाले यांनी सांगितले कि पुढच्या महिन्यात आझाद मैदानावर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी ओबीसी हक्क परिषद दिल्ली चे राष्ट्रीय संघटक सुरेशसिंह परिहार, महाराष्ट्र प्रदेश संघटक काशीनाथ पोतदार, राष्ट्रीय सचिव रंगनाथ गुरव, संतोष सुतार, अशोक पाटील, राजेशभाऊ पंडित आदी पदाधिकारी उपस्थित होते.