सुरेश पोटे यांची अध्यक्ष पदी बिनविरोध निवड
मुंबई/ प्रतिनिधी-
मुंबई प्रादेशिक विभागाची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष शरद डिचोलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेहरू नगर ज्येष्ठ नागरिक मंडळ कुर्ला येथे संपन्न झाली.
सभेची सुरवात श्री. साने गुरुजी यांच्या “खरा तो एकची धर्म” या कवितेने करण्यात आली.
मागील सभेचे इतिवृत्त वाचन सचिव सुरेश पोटे यांनी केले. ज्ञात-अज्ञात दिवंगतांना श्रद्धांजली, वार्षिक जमा-खर्च मंजुरी, लेखा परीक्षकांची नेमणूक करणे इत्यादी कामकाज झाले.
सदर सभेत, निवडणूक अधिकारी अनंत भाटे व यशवंत देशपांडे यांनी अलिकडे पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर केला.
निवडणूक बिनविरोध झाली
त्यानुसार फेसकॅाम - मुंबई प्रादेशिक विभागाची २०२४ ते २०२७ पर्यंतची नवीन कार्यकारिणी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली ती खाली नमूद केल्याप्रमाणे आहेः
१) अध्यक्ष - सुरेश पोटे
२) उपाध्यक्ष - डॉ रेखा भातखंडे,
३) सचिव - मुकुंद फडतरे
४) सह सचिव - राजन फणसीकर
५) कोषाध्यक्ष - सुधीर सावंत
कार्यकारणी स्वीकृत सदस्य म्हणूनः
प्राचार्य लता पोवार, बबन पाटणकर, बळवंत पाटील व सुरेश सरनोबत यांची निवड झाली.
त्याचप्रमाणे, सर्वसाधारण सभेत - संपर्क सचिव दिलीप गाडेकर, संघटक सचिव स्वाती फडके सांस्कृतिक अध्यक्ष म्हणून प्रतीभा सराफ, निमंत्रित सदस्य - उज्ज्वल पाठरे, दिलीप धारकर, विनय पाटील व संजय साने यांची निवड करण्यात आली.
सल्लागार पदी विजय औंधे यांची निवड एकमताने करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित पदाधिकार-यांनी आपला अल्पपरिचय करून दिला.
या सभेस पदसिद्ध अध्यक्ष श्री विजय औंधे व व श्री शरद डिचोलकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
नूतन कार्यकारिणी सदस्यांना अध्यक्ष शरद डिचोलकर यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
सुरेश पोटे यांनी सर्वांचे आभार मानताना आपण सर्वांनी एकत्र व एक विचाराने काम करावे असे आवाहन केले.
राष्ट्रगीत गायनानंतर अल्पोपहार करून अत्यंत खेळी मेळीच्या वातावरणात सभा समाप्त झाली.