शालेय समितीचे अध्यक्षपदी घाटगे तर उपाध्यक्षपदी तनवीर शेख यांची निवड
अक्कलकोट/प्रतिनिधी- प्रविणकुमार बाबर
तालुक्यातील सांगवी बुद्रुक जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शालेय समितीचे अध्यक्षपदी प्रवीण घाडगे तर उपाध्यक्षपदी यांची बहुमताने निवड झाली. दरम्यान शालेय समितीच्या सदस्य म्हणून आनंदी जाधव कल्पना मोरे नंदिनी रेड्डी आकाश सोनकांबळे स्वाती वाघमारे रूपाली गायकवाड दाऊद चाबुकस्वारिन निसार पठाण मनोज मोरे यांची निवड करण्यात आली. या निवडीच्या अनुषंगाने शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच अबुबकर शेख,मुख्याध्यापक पोपट कोरेकर, शिक्षक परमेश्वर किणगे, महावीर येणगुरे शरबसप्पा अष्टगी,अशोक सुतार चारुलता पाटील,ज्योती निकाळजे,परवीनबानो मुल्ला, गणेश मोरे बाळासाहेब भोसले, प्रविणकुमार बाबर, प्रदीप सलबत्ते, देविदास रेड्डी, बबन गायकवाड, आकाश सोनकांबळे पिंटू वाघमारे,निसार पठाण, सागर मोरे, समर्थ घाडगे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते यांच्या निवडीबद्दल अभिनंदन व कौतुक होत आहे.