Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

Responsive Ad Here

 ⭕ ब्रेकिंग सुपरफास्ट ⭕


    रस्ता सुसाट, पण ब्रेकर सतरा साठ


  राष्ट्रीय महामार्ग विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष


   अक्कलकोट वागदरी रोडवर वेडीवाकडी    वळणामुळे वारंवार होतात अपघात


गेल्या 6 महिन्या खालीच अक्कलकोट वागदरी रस्त्याची खड्डे बुजवा.. पैसे उपसा योजेना राबविण्यात आली होती


मलम न लावता पट्टी केल्याने अक्कलकोट वागदरी रस्ता पुन्हा खड्डेमय





         अक्कलकोट/ प्रतिनिधी- प्रविणकुमार बाबर 

     तालुक्यातील वागदरी रस्त्यावर डांबर उखडून खड्डे पडल्याने  वाहनचालकांना यांचा नाहक त्रास होत असून, विशेष धक्कदायक बाबा म्हणजे या रस्त्याला सतरा साठ ब्रेकर असून, आणि कित्येक धोकादायक वेडीवाकडी वळणे आहेत. या वेडी वाकड्या वळचा अंदाज नवीन वाहन चालकांना येत नसल्याने आतापर्यंत कित्येकांना या अक्कलकोट वागदरी रोडवर जीव गमावावं लागला असून, या घटना वारंवार घडतात पण या गंभीर घटनेची कोणीच दाखल घेत नाही. 

                 वेडी वाकडी वळणे व सतरा साठ ब्रेकराचा संध्याकाळी च्या वेळी व दिवसा देखील वाहन चालकाच्या निदर्शनास येत नाहीत पण गाडी जवळ जाताच हे ब्रेकर व वळणे दिसतात अचानक पणे गाडी कंट्रोल करणे हे वाहन चालकांना धोक्याचे ठरत असून, यापूर्वी कित्येकांचा बळी या रोडवर गेलाय पण राष्ट्रीय महामार्ग व स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी केवळ झोपेचे सोंग घेऊन नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा स्वरूप आपणास वारंवार पाहायला मिळत आहे. 

आतापर्यत 20 जण या रोडवर मृत्युंमुखी पडले असून, या मृत्यूला सर्वस्वी राष्ट्रीय महामार्ग विभाग जबाबदार असून, संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यावर गुन्हा करण्याची मागणी मराठा सेवा संघांचे जिल्हाकार्यकारणी सदस्य प्रवीण घाटगे यांनी केली असून, हा अक्कलकोट वागदरी रस्ता तात्काळ दुरुस्त होऊन या रोडवरील बेकायदेशीर ब्रेकर काढून आवश्यक त्या ठिकाणी ब्रेकर करण्यात यावे व अक्कलकोट वागदरी हा रस्ता सा बा विभागाच्या आखतरीत होता पण गेल्या 5 ते 6 वर्षांपासून हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाच्याकडे हस्तातरीत करण्यात आला आहे. या विभागाच्या ठेकेदार व अधिकाऱ्यानी या गंभीर बाबीकडे  डोळेझाक करीत असून, आणखीन किती बळी गेल्यावर हा रस्ता होणार आहे...? असा सवाल नागरिकांतुन विचारला जात आहे.

              अक्कलकोट वागदरी राष्ट्रीय राज्य महामार्ग हा रस्ता कर्नाटक व मराठावाडा यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा रस्ता समजला जातं असून या रस्त्यावर सर्वात जास्त रहदारी असते. या सांगवी बु पुलाजवळ पडलेल्या मोठ्या खड्ड्यात आत्तपर्यंत 30 ते 40 जण पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून, त्यातच एका महिलेचे मृत्यू झाले आहे. अशा गंभीर घटना वेळोवेळी घडत असताना देखील राष्ट्रीय महामार्ग विभाग हे झोपेचे सोंग घेत आहे. जर येत्या आठवड्याभरात हा अक्कलकोट वागदरी राष्ट्रीय महामार्गची दुरुस्ती न केल्यास सांगवी बु सह पंचक्रोशीतील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करण्याची चर्चा  खेडपाड्यात रंगली आहे.




प्रविण घाटगे, मराठा सेवा संघ जि. का. सदस्य-

                        👇


 अक्कलकोट वागदरी रस्ता हा गेल्या सहा महिन्याखालीच दुरुस्त करण्यासाठी खड्डे झाकून पैसे उपसा ही योजना राबविण्यात आली होती. पण सहा महिन्यात पुन्हा या रस्त्याची वाट लागली आहे. बोगस कामाची चौकशी होऊन हा रस्ता पुन्हा दुरुस्त करावा व वेडी वाकडे वळणे असल्याने वारंवार अपघात घडतात. याचा राष्ट्रीय महामार्ग विभागाने जर दाखल घेऊन या रस्त्याचा प्रश्न येत्या 8 दिवसात मार्गी न लावल्यास सांगवी बु येथे रस्ता रोको आंदोलन करणार आहे.