Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

भारताचा इंग्लंड वर रोमहर्षक विजय तर सिंगापूरला दणका

Responsive Ad Here

 इनडोअर क्रिकेट मास्टर्स वर्ल्ड सिरीज 

भारताचा इंग्लंड वर रोमहर्षक विजय तर सिंगापूरला दणका   





कोलंबो-  २९ सप्टेंबर, क्री. प्र.- बाळ तोरसकर 

 जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या (WICF) मान्यतेने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या सहकार्याने इनडोअर क्रिकेट मास्टर्स वर्ल्ड सिरीज ऑस्टेशिया स्पोर्ट्स क्लब, थलावाथुगोडा, कोलंबो, श्रीलंका येथे सुरु झाली आहे. या स्पर्धेत आठ देशांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये यजमान श्रीलंकेसह, भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, द. आफ्रिका, युएई व सिंगापूर यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळेल. या मास्टर्स वर्ल्ड सिरीजमध्ये ३० वर्षांवरील महिला व ३५, ४०, ४५, ५० व ५५ वर्षांवरील पुरुष या सहा गटात झालेले सामने पाहायला मिळणार आहेत. भारतातर्फे ३० वर्षांवरील महिला व ३५, ४०, ४५ वर्षांवरील पुरुष संघ सहभागी झाले आहेत.


भारताच्या ४० वर्षांवरील पुरुष संघाने दमदार कामगिरी करताना तगड्या इंग्लंडवर  रोमहर्षक तर दुबळ्य सिंगापूर विरुध्द धमाकेदार विजय साजारा केला. भारताचा पहिला सामना तगड्या इंग्लंड विरुध्द झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताच्या प्रशांत कारिया (१३ धावा व ३ विकेट) व नागेश सिंग (वजा ६ धावा व १ विकेट) या पहिल्या जोडीने पहिल्या चार षटकांत ७ धावा जमवल्या, त्यानंतर आलेल्या अभिषेक वेस्ली (२ धावा व २ विकेट) व कार्तिकेयन सुब्रमानियन (उपकर्णधार) (१० धावा व १ विकेट) यांनी १२ धावांची भर घातली व त्यानंतर आलेल्या कर्णधार प्रसन्ना कुमार (१८ धावा) व शम्सीर चिंताविदा ( १४ धाव्वा) यांनी ३२ धावांची भर घालून भारताचा धावफलक मजबूत केला. तर चौथ्या शेवटच्या जोडीतल्या राजीव चंद्रसेकर (१० धावा) व हिरेन प्रजापती (१८ धावा व १ विकेट) यांनी २९ धावांची भर घालून भारताला चांगल्या स्थितीत आणून सोडले. 



या नंतर आलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत पहिल्या जोडीने (सेन ओंगेर्स व शॉन हेंडेर्सन) ११ धावा तर दुसऱ्या जोडीने (नेइल फुर्लोंगर व डेविड बाॅल) १२ धावांची भर घातली. यामुळे खरतर भारतीय संघावर विजयाचे दडपण होते पण तिसऱ्या जोडीतील मिचेल जॉनस (कर्णधार)  व अॅरॉन वॅटसन यांना २४ धावत रोखण्यात भारताला यश आल्याने भारतीय खेळाडू भलतेच जोशात होते. चौथ्या व शेवटच्या जोडीने (जीम जॉनसन व अॅरॉन वॅटसन) यांनी कडवी लढत दिली (३१ धावा) मात्र शेवटच्या चेंडूवर भारताच्या हिरेन प्रजापतीने विकेट घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करताना ८०-७९ असा एका धावेने विजयी जल्लोष केला.  


यानंतर झालेल्या सामन्यात भारताला युएई कडून ९१-५३ अश्या मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र भारताने खचून न जाता पुढच्या सामन्यात दुबळ्या सिंगापूरचा ९२-०८ असा ८४ धावांनी पराभव करून जोरदार मुसंडी मारली. तीन सामन्यानंतर भारत गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे तर ऑस्ट्रेलिया, युएई, द. आफ्रिका अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत.     


भारताच्या प्रथमच सहभागी झालेल्या ३० वर्षांवरील महिलांना मात्र इंग्लंड कडून ११७-०८, न्यूझीलंड कडून १२५- वजा ३५ व द. आफ्रिके कडून १५१-३० अश्या दारूण पराभवांना सामोरे जावे लागले. तसेच भारताच्या ३५ व ४५ वर्षांवरील पुरुष संघांची कामगिरी सुध्दा सुमार दर्जाची राहिली आहे.