आरोग्यदायी समाज घडविण्यासाठी खेळांची भूमिका महत्त्वाची - डॉ. कुलकर्णी
विजयपुर/प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
आरोग्यदायी समाज घडवण्यासाठी खेळाची भूमिका महत्त्वाची असते असे बीएलडीई संस्थेचे मुख्य सल्लागार आणि बीएलडीई डीम्ड युनिव्हर्सिटीचे कुलसचिव डॉ. आर. व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले
शहरातील बीएलडीई संस्थेचे श्री. बी. एम. पाटील नर्सिंग कॉलेजच्या सहकार्याने आयोजित राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कलबुर्गी विभागीय स्तरावरील पुरुष कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
आजकाल विविध कारणांमुळे खेळातील आवड कमी होत आहे. तथापि, प्रत्येकाने खेळात भाग घेतल्यास ते शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होण्याबरोबरच मानसिकदृष्ट्याही तंदुरुस्त होऊ शकतात. यामुळे सुदृढ समाज निर्माण होण्यासही मदत होईल, असे सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. शाल्मन चोपडे म्हणाले की, खेळात हार-जीत सामान्य असते. दोघांचाही समानतेने स्वीकार करून प्रगती केली पाहिजे. आम्ही पुन्हा प्रयत्न केल्यास पुढील सामने जिंकू शकू, असे सांगितले
या प्रसंगी डॉ. जयश्री पुजार आणि रूपा, संस्थेचे संचालक एस. एस. कोरी, उपसंचालक कैलास हिरेमठ, महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या प्रमुख सुधीर बाळी, क्रिकेट प्रशिक्षक प्रशांत हजेरी, एस. सी. पवार, सौजन्या पुजार आदी उपस्थित होते.