बोकुड जळगाव तांडा प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करण्याची ग्वाही - पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड
जळगाव/ प्रतिनिधी
जिल्हा परिषद शाळा बोकुड जळगाव तांडा येथील शिक्षकाला गाव गुंडाकडून झालेल्या मारहाणीच्या बद्दल शिक्षक समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली.
अशा पद्धतीने शिक्षकांना मारहाण होऊ नये. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये महिला शिक्षिका असतात. वाडी वस्ती तांड्यावर कर्तव्य बजावणाऱ्या सर्वच कर्मचारी व शिक्षकांना अश्या प्रकारे मारहाण होणे मानसिक छळ करणे हे सामाजिक दृष्ट्या अतिशय मोठे गैरवर्तन आहे. सदरील आरोपीला तात्काळ अटक करणार असल्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड यांनी सांगितले.
शिष्टमंडळात दिलीप ढाकणे, राजेश हिवाळे,महेंद्र बारवाल, श्रीराम बोचरे, राजेश भुसारी, संतोष ताठे, शेख अब्दुल रहीम , संजय बूचुडे, गणेश सोनवणे, प्रवीण संसारे, चंदू लोखंडे, अनिल दाणे, सचिन एखंडे, विजय ढाकरे , प्रवीण गायकवाड देवा सुरडकर ,अविनाश पाटील , अरविंद आडे, विलास पठाडे, हनुमंत पट्टेवाड , नितीन घोडके आदींची उपस्थिती होती.