लुटमार प्रकरणी तिघांना अटक
विजयपूर/प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
कोल्हापुरातील एका व्यापाऱ्याची कार अडवून लुटमार केल्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
कोल्हापूर येथील व्यापारी अशोक प्रभाकर कुलकर्णी यांची दिनांक: २९ ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी कार थांबवून चाकूचा धाक दाखवून डोळ्यात मिठाची पूड फेकली व 16 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन 6 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी रोख रक्कम 6000/ - रुपये लुटल्या केल्याची घटना जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील कोळ्ळूर क्रास तंगडगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती गुन्हा दाखल झाल्यानंतर दोनच दिवसात
पोलिस अधीक्षक विजयपूर, पोलिस उपअधीक्षक ब. बागेवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले होते
सदर प्रकरणाचा तपास गांभीर्याने घेऊन तांत्रिक साहाय्याने या कृत्यामध्ये सहभागी असलेले आरोपी राकेशचे महांतेश सावंत वय-24 रा. निपाणी जिल्हा बेळगाव; रोहन सुनील वाडेकर वय-24 , रा. निप्पाणी जिल्हा बेळगाव व प्रथमेश बाबासाहेब हवालदार वय-22 या. निप्पाणी जिल्हा बेळगावी यांना अटक करून चौकशी केली असता, आरोपीचा गुन्हा कबूल केला असून आरोपींकडून
16 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी रु. 1,10,000/- किंमत 6 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठीची किंमत रु. 40000/-
रोख रक्कम रु.770/-, पल्सर कंपनी मोटरसायकल दोन मोबाईल फोन, एक
सुऱ्या अशा प्रकारे एकूण रु.170770=00 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
सीपीआय मल्लिकार्जुन तुळसीगेरी, पीएसआय संजय तिपरड्यी, आर एल मुन्नाभाई , पोलिस कर्मचारी बी के गुडदिन्नी आर एस पाटील, सी एस बिरादार एस एल हत्तरकीहाळ या पोलिस पथकाने आरोपींना अटक करण्यात यशस्वी झाले.
त्यांना
जिल्हा पोलिस प्रमुख त्रृषिकेश सोनावणे यांच्या हस्ते रोख पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.