Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

गणेश विसर्जन व आरास स्पर्धेचा निकाल

Responsive Ad Here

गणेश विसर्जन व आरास स्पर्धेचा निकाल 

 स्वराज्य माहिती अधिकार संघटनेच्या गणेश विसर्जन मिरवणूक आरास स्पर्धेत नवभारत ने प्रथम ,  ब्रम्हांडनायक ने द्वितीय तर राम गल्ली गणेश मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला




 

अक्कलकोट/ प्रतिनिधी- चंद्रकांत वेदपाठक 

    स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना शाखा तालुका अक्कलकोट आयोजित, अक्कलकोट श्री गणेश विसर्जन मिरवणूक भव्य आरास स्पर्धेत नवभारत गणेश मंडळाने प्रथम क्रमांक, ब्रम्हांडनायक गणेश मंडळाने द्वितीय क्रमांक, राम गणेश मंडळाने तृतीय क्रमांक तर हरवाळकर गल्ली गणेश मंडळाने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले आहे.

   सावरकर चौक मेनरोड अक्कलकोट येथे झालेल्या  शानदार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष दिनेश काटकर होते, स्वागत व प्रस्तावना स्वराज्यचे तालुका अध्यक्ष व पत्रकार चंद्रकांत  वेदपाठक यांनी केले.

    स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष  दिपक कांबळे   संस्थापक महासचिव कमलेश शेवाळे  यांचे मार्गदर्शनाखाली  "अक्कलकोट भगवान श्री गणेश विसर्जन मिरवणूक आरास स्पर्धेचे " आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल व  पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या जल्लोशात पार पडला.

    स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे नूतन प्रदेश अध्यक्ष सौ. धनश्री उत्पात, विश्वस्त उमेश काशीकर, जिल्हा अध्यक्ष दिनेश काटकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुशील फडके, सोलापूर शहर अध्यक्ष विनोद भोसले, व पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अरविंद पाटील,  पोलीस अधिकारी निलेश बागाव या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या गणेश मंडळांना पारितोषिक   श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.  स्वराज्य चे नूतन प्रदेश अध्यक्ष सौ. धनश्री उत्पात यांचा माहेरची साडी चोळी देऊन सौ. अंबूबाई वेदपाठक यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.

    या स्पर्धेत शहाजी प्रशालेचे आनंद खजुरगिकर ,  मंगरुळे प्रशालेचे गिरीश पट्टद ,  मूकबधिर निवासी शाळेचे कला शिक्षक अतुल जाधव  या तिघांनी परीक्षक निरीक्षक म्हणून सर्वोत्तम  कार्य केल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते श्री दत्त मूर्ती व पुष्गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. 



   प्रथम पारितोषिक दिपक पोतदार,  द्वितीय पारितोषिक काशिनाथ पोतदार, तृतीय पारितोषिक दयानंद बिडवे तर उत्तेजनार्थ पारितोषिक पंकज कोरेकर यांच्या सौजन्याने ठेवण्यात आले होते. या प्रसंगी दिपक पोतदार, गौरीशंकर चनशेट्टी, दयानंद बिडवे, सौ. वर्षाताई चव्हाण, काशिनाथ पोतदार, पंकज कोरेकर, बलभीम पवार, अप्पू संगापूरे,अनिल वेदपाठक,  अप्पासाहेब धुमाळ, सौ. मीराबाई बुद्रुक, सौ. अंबुबाई वेदपाठक, सुरेश वेदपाठक आदीसह विविध मंडळाचे अध्यक्ष, मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.