संगमेश चुरी यांची नियुक्ती
विजयपूर/प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
कर्नाटक माध्यम अकाडमी सदस्य म्हणून विजयपूर जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संगमनेर टी.चुरी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची अधिसूचना वार्ता व प्रसार खात्याचे सचिवांनी प्रसिद्धीस दिले आहे.
श्रमिक पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष शिवानंद तगडूर, दावणगिरीचे एम. मंजुनाथ, शोभा एम. सी., हुबळी येथील अब्बास मुल्ला यांच्यासह एकूण अकरा जणांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.