लाखो रुपयांचा चोरीचा मुद्देमालासह एकास अटक
विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
विजयपुर शहरात सुरू असलेल्या चोरीच्या प्रकरणांचा तपास करण्यात विजयपुर पोलिसांना यश आले असून या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून रु. 26,82,500 किंमतीच्या मौल्यवान सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत
रविवारी पत्रकार परिषदेत जिल्हा पोलिस अधीक्षक ऋषिकेश सोनावणे म्हणाले की, विजयपुर येथे सुरू असलेल्या चोरीच्या घटनांच्या तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने अत्यंत चतुराईने या प्रकरणांचा तपास केला असून
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अश्फाक सैफनसाब शेख जातगार असे आहे. तपासादरम्यान आरोपीचा जलनगर, एपीएमसी यार्ड पोलीस ठाणे आणि आदर्श नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे समोर आले.
ते म्हणाले की, चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले होते, हे पथक महाराष्ट्रातील सांगली, पुणे आणि बागलकोट आणि बेळगाव या शेजारील जिल्ह्यात आरोपींची तपासणी करत असताना आरोपीस अटक केली आहे .
तपास पथकाच्या कार्याचे कौतुक
करून यश मिळवणाऱ्या टीमला बक्षीस जाहीर करण्यात आले असून, एएसपी रमण गौडा हत्ती, एस. मारिहाळ, डीवायएसपी बसवराज यलीगार, पोलीस अधिकारी मल्लया मठपती, सीताराम लमाणी, प्रेमा कूचबाल, कर्मचारी वाय.पी. कबाडे, एस.ए. बनपट्टी, महेश सालकेरी, जे.एस. वनंजकार, असीप लष्करी, आनंदय्या पुजारी, निंगाप्पा वाटार, शशिकांत तोरवी, गुरुपाद कन्नोल्ली, सचिन जाधव, आर डी मुल्ला, गुंडू गिरनीवडर, महमद बागवान, जब्बार इलकल यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक ॠशिकेश सोनावणे यांनी सांगितले.