अक्कलकोट तालुका शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
अक्कलकोट/ प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची आर्थिक वरदायिनी ठरलेल्या अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा काल दि 21 सप्टेंबर 2024 रोजी लोकपुरे हॉलमध्ये संपन्न झाली.या सभेमध्ये सभासदांच्या गुणवंत पाल्यांबरोबरच आचार्य दोंदे गुणवंत शिक्षक पुरस्कार व तसेच आदर्श शाळा पुरस्काराचे वितरण यावेळी करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिक्षक नेते राजशेखर अप्पी उंबराणीकर , प्रमुख उपस्थिती सौ.शांभवीताई सचिन कल्याणशेट्टी,
तर सोलापूर जिल्हा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष वीरभद्र यादवाड,गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे,विस्तार अधिकारी सोमशेखर स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षक हे समाजाला दिशा देण्याबरोबरच राष्ट्र घडविणारे जणू शिल्पकार असतात,अशा शिक्षकांच्या पाठीवर तालुका पतसंस्थेने कौतुकाची थाप टाकून त्यांना प्रेरणा देण्याचे चांगले काम केले अशा भावना सौ शांभवी सचिन कल्याणशेट्टी यांनी यावेळी व्यक्त केली.शिक्षकांचे आर्थिक प्रश्न सोडवून त्यांच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा उचलणारी अक्कलकोट तालुका पतसंस्था असून शाळा,शिक्षक यांना पुरस्कार देऊन पाठबळ देण्याचे काम पतसंस्थेने केले आहे,असे मत जिल्हाध्यक्ष वीरभद्र यादवाड यांनी व्यक्त केले.33 सभासद शिक्षक-शिक्षिकांसह 7 आदर्श शाळांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
या सभेस तालुका पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन मंजुनाथ भतगुणकी,व्हा चेअरमन पोमु राठोड, संचालक योगेश बारसकर,काशिनाथ विजापुरे,पुंडलिक कलखांबकर,शंकर अजगोंडा,सुनील सवळी,अपर्णा रंगदाळ,राजश्री सोलापुरे, बाळकृष्ण म्हेत्रे उपस्थित होते.यांच्याबरोबरच
शिक्षक नेते ,संघाचे राज्यसदस्य रेवणसिद्ध हत्तुरे,शिक्षक समितीचे कन्नड जिल्हाध्यक्ष बसवराज गुरव,जिल्हा उपाध्यक्ष बाळकृष्ण म्हेत्रे,कन्नड जिल्हाध्यक्ष सिद्धाराम चौधरी,जुनी पेन्शन जिल्हा नेते सैदप्पा कोळी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष बसवराज खिलारी,सरचिटणीस शशिकांत रंगदाळ,कार्याध्यक्ष सतिश पाटील भीमशा चौगुले,उपाध्यक्ष व्यंकट धर्मसाले, जिल्हा पतसंस्थेचे संचालक शिवाजी पाटील, दक्षिण अध्यक्ष महिबूब सवार, जिल्हा संघाचे उपाध्यक्ष सिद्राम कटगेरी, मल्लिनाथ पुजारी, सरचिटणीस सतीश वाले, श्रीशैल सुतार,उत्तर अध्यक्ष अप्पाशा उमराणी,संचालक संजय देवकते, संजय मंगरुळे,न प अध्यक्ष सिध्दाराम पुजारी, कन्नड जिल्हा उपाध्यक्ष बसवराज दोडमनी ना प सरचिटणीस चंद्रकांत कौटगी केंद्र प्रमुख सुरेश शटगार, बा ना चव्हाण, आमसिद्ध म्हैत्रे, लकपा पुजारी, शि तु शिंदे महमदहयात पाटील, विद्याधर शिवशरण, गुरुनाथ नरुणे अण्णा,राहुल गोविंदे सतिश पट्टेद, गणपती पवार, गणेश माळी, गजानन मितराशे, बशीर बागवान सिध्दाराम हडपद, तानाजी चव्हाण, जयश्री मुनोळी, अंबुजाताई बोरगांवकर,ममता पट्टेद,सुलभा लोखंडे,लता कांबळे, तेजश्री टोणपे हे उपस्थित होते.जीवराज खोबरे, दयानंद परिचारक,शरद कुंभार,बालाजी हादवे,शिवाजी राठोड, सतीश दरीकर,कुमार माळगे, यल्लपा माशाळे, श्रीशैल स्वामी,प्रशांत वागदरीकर,महादेव चव्हाण,अश्विनी यादव, लक्ष्मी कोटे, गिरीश हवालदार,अंजली डहाके,मसरत गौर, गायत्री नल्ला, अशोक चौगुले, संजीवकुमार बेण्णीसूर,कलावती अरसगोंड,गणपती किणगी दिनेश चव्हाण, ईरप्पा बासरगांव, , शिवानंद भडारकवठे, राजाराम सुरवसे,जयश्री खसकी,प्रधानी बंडगर, राजश्री हलसंगी, दिपक केंद्रे, सिध्दाराम होदलूरे , गणपती किणगी,मंजूषा कोक्कळगी, नजमुन्निसा मुजावर, हिराजराय बिराजदार, यांच्याबरोबरच जि.प.मराठी शाळा कोर्सेगांव,जि.प.मराठी शाळा घोळसगांव,जि प.मराठी शाळा सुलेरजवळगे,जि प कन्नड उडगी,जि प कन्नड शाळा नागूर, जि प उर्दू शाळा मैंदर्गी,न प प्रमिलाराजे मुलींची गर्ल्स स्कुल अक्कलकोट यांना आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय सावंत,काशिनाथ विजापूरे यांनी तर आभार पुंडलिक कलखंबकर यांनी मानले.