डासांमुळे मलेरिया, डेंग्यु सारखे ताप...!
दुधनी शहरात घाणीचे साम्राज्य;प्रशासन मात्र बघ्याची भुमिका घेत आहेत- राजेंद्र इंगळे
अक्कलकोट /प्रतिनिधी -
दुधनी- नगरपरिषदेचे हलगर्जीपणा मुळे दुधनी शहरात ठिकठिकाणी पाणी साचुन डासांचे प्रमाण वाढलेला आहे त्यामुळे मलेरिया, डेंग्यु सारखे ताप लहान मुलांना होत आहे.
दुधनी शहरात भाजीपाला मार्केट, म्हेत्रे प्रशाला बाजुतील बगीचा, दोन्ही बसस्थानक, लक्ष्मी नगर, वडार गल्ली, रामवाडी इत्यादी ठिकाणचे गटार तुंबले आहेत व सफाई कर्मचारी महिना दोन महिन्याने येऊन गटार वरचेवर काढुन जातात, शहरातील सर्व महिला शौचालय खराब झाले आहेत त्यात होंडा शोरुम बाजुतील महिला शौचालय हे गेल्या पंधरा वर्षापासून नादुरुस्त आहे.
दुधनी नगरपरिषदेला कोट्यावधी रुपये मंजुर झाले तरी सुद्धा विकासकाम मात्र अर्धवटच आहे, दुधनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना दुधनी शहरातील सर्व गटार, शौचालय व डासांचे प्रमाण वाढु नये म्हणून औषधे, फवारणी करा म्हणून निवेदन दिले असताना देखील मुख्याधिकारी डाके मात्र बघ्याची भुमिका घेत आहेत असे माहिती दुधनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ( अ.प.गट )राजेंद्र इंगळे यांनी दिली.