Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

भारतीय स्टेट बँकेच्या मॅनेजर यांचे ग्राहकांशी असभ्य वर्तन

Responsive Ad Here

 भारतीय स्टेट बँकेच्या मॅनेजर यांचे ग्राहकांशी असभ्य वर्तन






पासबुक छपाई व अन्य यंत्रणा नादुरुस्त अवस्थेत


अक्कलकोट प्रतिनिधी- प्रविणकुमार बाबर 

           भारतीय अर्थव्यवस्थे मध्ये सर्वात मोठी अशी समजली जाणारी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया ही, बँक देशभरात सर्वात जलद गतीची बँक समजली जात असून, इकडे तालुक्यात मात्र वेगळेच पाहायला मिळत आहे. अक्कलकोट तालुक्यातील या भारतीय स्टेट बँकेचे खातेदार यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे.

       बँकेचे मॅनेजर हे ग्राहकांशी असभ्य वर्तन करत असल्याचे दररोज पाहायला मिळत असून, उद्धट बोलणे, अरेरावी बोलणे, तुम्हांला कुठं तक्रार करायची तिथे करा, मी कुणाला घाबरत नाही. माझं कोणीच काय करू शकत नाही. असे उद्धट बोलून ग्राहकांना धमकी वजा इशारा देताना अनेकांनी अनुभवले असून, बँकेत पासबुक छापन्याची मशीन वारंवार बंद अवस्थेत असते तर बँकेच्या कर्मचाऱ्याशी संपर्क केला असता. आमचा याच्याशी काय संबंध नाही. त्याचा इंजिनियर येईल व काम केल्यावर मशीन चालू होईल असे उडवाउडवी चे उत्तरे देतात. शिवाय विशेष धक्कादायक बाबा म्हणजे एटीएम चे तर नेहमीच तीन तेरा वाजलेले असतात. या बाबतीत विचारणा केली तर त्यामध्ये आणखीन कॅश भरायची आहे. असली शिल्लक कारणे देतात. 

            वीस हजार व काढणे व भरणे असल्यास चौकातल्या सीएसपी  केंद्रावर जाऊन भरा अथवा काढा असे वयोवृद्ध नागरिकांना हे बँकेचे कर्मचारी सांगतात. मग हे काय बँकेत करतात ...? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. बँकेत आलेल्या प्रत्येक ग्राहकाला हे सांगतात ऑनलाईन व्यवहार करा. हा प्रश्न ग्राहकांचा आहे. ऑनलाईन करायचा कि ऑफलाईन, बँक कर्मचारी हे नेहमी कागद वाढवण्याचे काम सांगतात व टाळाटाळ करत असल्याची घटना प्रत्यक्षदर्शी सांगतात.अक्कलकोट भारतीय स्टेट बँकेत नेहमी ग्राहकां बाबतीत असाच प्रकार सरास पाहायला मिळत असून, या अतिशय गंभीर बाबीची दाखल घेऊन या असभ्य वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हावी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी या बाबतीत लक्ष घालून या उद्धट वागणाऱ्या बँक मॅनेजर ची तात्काळ बदली करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे. 

         या गंभीर घटनेची दखल घेत काही ग्राहक हे थेट जिल्हाधिकारी सोलापूर , लीड ब्रँच सोलापूर, रिजनल हेड ब्रँच, मुंबई यांच्याकडे येत्या दोन दिवसात लेखी तक्रार करणार आहेत.