Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले

Responsive Ad Here

      20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर ला निकाल 

अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले 





नवी दिल्ली- 

             संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित होतील. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबद्दलची मोठी घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रात आचारसंहिताही लागू झाली आहे.


       यावेळी बोलत असताना सर्वात आधी मुख्य निवडणूक आयुक्त निवडणुकीविषयी माहिती दिली आहे. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान केल्याबद्दल निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जनतेचे आभार मानले. तसेच काही दिवसांपूर्वीच आम्ही महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांना भेट दिली होती. आम्ही तेथील सर्व व्यवस्थेचा अभ्यास केला होता. महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत. तसेच २८८ जागांवर मतदान होणार आहे. महाराष्ट्र राज्यात २६ नोव्हेंबरला विधानसभेचा ५ वर्षाचा कार्यकाल संपणार आहे. महाराष्ट्रात १ लाख १८६ मतदान केंद्र आहेत. २३४ जागा या सर्वधाराण उमेदवारांसाठी तर एसटी प्रवर्गासाठी २५ तर २९ जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेचा काळ २६ नोव्हेंबर रोजी संपत आहेत. 


 महाराष्ट्र विधानसभा निकाल 2019 पक्षीय बलाबल काय?

भाजप – 105

शिवसेना – 56

राष्ट्रवादी – 54

काँग्रेस – 44

बहुजन विकास आघाडी – 03

प्रहार जनशक्ती – 02

एमआयएम – 02

समाजवादी पक्ष – 02

मनसे – 01

माकप – 01

जनसुराज्य शक्ती – 01

क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01

शेकाप – 01

रासप – 01

स्वाभिमानी – 01

अपक्ष – 13

एकूण – 288