कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेच्या
जिल्हा अध्यक्षांची निवड
कलबुरगी / प्रतिनिधी- गुरय्या स्वामी
कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेतर्फे जिल्हावार नूतन अध्यक्षांची घोषणा करण्यात आली असून विजयपूर, बेळगांव, बागलकोट, बिदर आणि चिक्कोडी जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली आहे.गुरुवारी येथे झालेल्या करामसाप कार्यकारणी बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे.
विजयपूर जिल्हाध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार दिपक शिंत्रे यांची निवड करण्यात आली असून बेळगाव जिल्हा अध्यक्षपदी प्रा. डॉ. मैजोद्दीन मैनोद्दीन मुतवल्ली यांची निवड करण्यात आली आहे.तसेच बिदर जिल्हा अध्यक्षपदी कवियत्री प्रा.मीनाक्षी काळे पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
बागलकोट जिल्हा अध्यक्षपदी जेष्ठ कवियत्री,लेखिका सुधा बटगेरी यांची तर चिक्कोडी जिल्हाध्यक्षपदी कवियत्री लता माने संकेश्वर यांची निवड करण्यात आली आहे. याचवेळी बेंगळूरूच्या माजी अध्यक्षा डॉ.संध्या राजन अणवेकर यांना राज्य कार्यकारणीवर निवड करण्यात आल्याने नूतन सर्व जिल्हाध्यक्षासह येत्या 10 नोव्हेंबर रोजी बेंगळूरू येथे महाराष्ट्र मंडळात होणाऱ्या एका कार्यक्रमात सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला.नंतरच्या काळात इतर जिल्हाध्यक्ष आणि प्रत्येक जिल्ह्यात तालुका कार्यकारणी घोषित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
करामसाप अध्यक्ष गुरय्या रे स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सरकार्यवाह प्रा. विजयकुमार चौधरी, कार्यवाह प्रभाकर सलगरे,बी. ए. कांबळे,मिलिंद उमाळकर, प्रमोद शहा,अभिषेक वळसंगकर,दयानंद सुरवसे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.