सिन्नर तालुक्यातील पुर्व भागात अतिवृष्टीमुळे दाणादाण
टमाटा, सोयाबीन,मका, द्राक्ष बागांसह कांदा रोपांचे अतोनात नुकसान
राम सुरसे/ सिन्नर प्रतिनिधी (दि.२०)
सिन्नर तालुक्यातील पुर्वभागात शनिवार दि. १९ रोजी सायंकाळी सात वा. मुसळधार पावसात सुरवात झाली सदर पावसामुळे शेतकर्यांची दाणादाण झाली.
रात्री अनेक भागांत झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पंचाळे,शिंदेवाडी, सांगवी, सोमठाणा, दहिवाडी,महाजणपूर, उजणी, पुतळेवाडी, शहा परीसरात पावसाचा मोठा जोर दिसून आला.अतिवृष्टी सदृष्य पावसामुळे टमाटा, मका,सोयाबीन, भाजीपाल्यासह छाटणी झालेल्या द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष व डाळींब बागायतदार शेतकरी त्यामुळे चिंतातुर झालेला आहे. बहुतांश ठिकाणी कापणी केलेली सोयाबीन व मका पाण्यात गेल्याचे दिसत आहे. हाता तोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावला गेल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
शनिवार सायंकाळनंतर सुरू झालेल्या
पावसामुळे अनेक भागांत कापणी केलेली मका, सोयाबीन भिजला आहे.छाटणी केलेली द्राक्ष बाग रोगराईस अनुकूल वातावरण झाल्याने डाऊनी व भूरी रोग बागांवर येऊन द्राक्ष घड जिरण्याची धोका निर्माण झाला आहे त्यामुळे महागडी औषधे फवारणीचा खर्च वाढणार आहे. अनेक शेतकर्यांची द्राक्ष छाटणीची कामे सदर पावसामुळे थांबणार आहेत.उशिराणे लागवड केलेली व माल विक्री योग्य झालेले
टमाटा पिकात पाणी साचल्याने झाडांची मुळे खराब होउन सदर पिक नामशेष होणार आहे. तीच परिस्थिती भाजीपाला पिकाची आहे.भाजीपाला पिकांवर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला.अनेक शेतकर्यांची कांदा रोप खराब झाली आहे. महागडे बीयाने खरेदी करूण टाकलेली कांदा रोप अति पावसामुळे खराब झाली आहे तर बहुतांश ठिकाणी सुरू असलेली कांदा लागवड पंधरा दिवस खोळंबणार आहे. शनिवारी सायंकाळी सात ते रात्री दिड वा.पावसाच्या सरी जोरदारपणे बरसत होत्या.
:-
देव नदी पूरकालव्यांमुळे सिन्नरच्या पूर्व भागातील बहुतांश पाझर तलाव अगोदरच भरलेले आहे. त्यात शनिवारी अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे उर्वरीत
नदी, नाले, पाझर तलाव तुडूंब भरून वाहू लागल्याने पुर्व भाग जलमय झाला आहे.विहीरींची पाणी पातळी कमालीची वाढल्यामुळे पूढील पिकांना मुबलक पाणी उपलब्ध झाल्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
:-
द्राक्ष बागांना डाऊनी, भूरी रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. काही बागा फुलोरा व पोंगा अवस्थेत आहेत तर काही भागांत दोडा अवस्थेत आहेत. पावसाचा थेंब मोठा असल्याने द्राक्ष मण्यांचा घड जिरण्याची व खराब होण्याची भीती आहे. सांगवी, सोमठाणा, दहिवाडी, महाजणपूर परीसरात वाईन द्राक्षांच्या बागा मोठ्या प्रमाणात आहे. अश्या बागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाईन द्राक्षांसाठी वाईन कंपण्यांकडून छाटणी तारीख दिलेली असते. पावसामुळे त्या तारखेस शेतकर्यांना बागा छाटणी करता येणार नसले मुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाचे नुकसानग्रस्त सर्वच पिकांचे त्वरीत पंचनामे करावे.
:- सोमनाथ शिंदे, द्राक्ष बागायतदार उजणी ता. सिन्नर