वरे कुटुंबीयांकडून गरजूंना साखर तर विद्यार्थी यांना वह्या पेन वाटप
राम सुरसे/सिन्नर प्रतिनिधी (दि.२२)
बारामती तालुक्यात मळद येथील कृषी भुषण शेतकरी प्रल्हाद वरे,त्यांचे कुटुंबीय व
किरण गोडसे (वरे) सोशल फाउंडेशन मळद-बारामती यांचे वतीने आई कै.लक्ष्मीबाई गुलाबराव वरे यांच्या तृतीय पुण्यस्मरणाचे औचीत्य साधुन शनिवार दि. १२ रोजी भैय्या बाबू वस्ती, वरे वस्ती, विशाल नगर व मळद गावातील ९० गरजू कुटुंबांना दिपावली सणानिमित्त साखर वाटप करूण त्यांची दिपावली गोड करण्याचा प्रयत्न केला. तसेच परीसरातील शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप करूण कार्यक्रमास उपस्थित सर्वांना भोजणाचा आस्वाद दिला. प्रल्हाद वरे,त्यांचे कुटुंबबीय व सगेसोयरे यांनी राबविलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे पंचक्रोशीतील नागरीकांनी कौतिक केले व स्वर्गीय कै.लक्ष्मीबाई गुलाबराव वरे यांना भावपूर्ण
श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमास वरे कुटुंबातील रामदास गुलाबराव वरे,सुमन वरे, बाळासो वरे,लता वरे, संगीता वरे, हनुमान वरे, शितल वरे,
श्रीमती रत्नप्रभा कुतवळ,श्रीमती कुमुदिनी जगदाळे सह परीसरातील मान्यवर तुकाराम गावडे, बापूराव गावडे, धनंजय गवारे, आनंदराव वाघमारे, लक्ष्मण गावडे, अनिल कांबळे, सनी सावंत, युवराज झांबरे, शैलेश गावडे, किशोर वरे, सुनील वरे, प्रविण कांबळे, हनुमंत रणपिसे, महेंद्र भोसले, विष्णु अहिवळे, विकास मोरे, सुखदेव कांबळे, अजिंक्य वरे, प्रथमेश वरे, सिद्धार्थ तावरे, आर्यन वरे सह मळद गावातील इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.