ऐन निवडणुका व दिवाळीत गाव झाला कचरा कुंडी - सुभाष गिण्णी
दुधनी नगरपालिका सफाई कर्मचार्यांचे बेमुदत संप
अक्कलकोट/ प्रतिनिधी
दुधनी नगरपालिकेत एकुण 14 सफाई कर्मचारी असुन, त्यात एक महिला, दोन पुरुष पाणी सोडणारे, एक मक्कदम आहे तर उरलेले 10 सफाई कर्मचारी पुर्ण दुधनी शहर स्वच्छ करणे जड जात आहे.
दुधनी नगरपालिकेत सफाई कर्मचारी फक्त 14 जणांची भरती केले आहे त्या पैकी कार्यरत 10 जण आहेत बाकीचे चार कर्मचारी सफाई करण्यासाठी आले तरच आम्ही कामाला लागणार नाही तर आमचे बेमुदत संप चालु ठेवणार म्हणून दुधनी नगरपालिकेचे सफाई कर्मचारी धर्मा शिंगे यांनी सांगितले आहे.
ऐन निवडणुक व दिवाळीत दुधनी शहर झाला कचरा कुंडी- सुभाष गिण्णी
दुधनी सारख्या शहरात कमीत कमी 25 सफाई कर्मचारी तरी पाहिजे, 10 कर्मचार्यांना पुर्ण शहर स्वच्छ करणे अवघड आहे, प्रशासनाने दुधनी शहर वास्तविकता बघुन अधिकाधिक सफाई कर्मचार्यांचे भरती करुन घ्यावी. सध्या विधानसभा निवडणुका व दिवाळी सारखी मोठी सणात दुधनी शहर कचरा कुंडी सारखे दिसत असल्याचे दुधनी तील किराणा व्यापारी सुभाष गिण्णी यांनी म्हंटले आहे.