डॉ. बाबुराव घोडके फाउंडेशनचे राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार जाहीर
इस्लामपूर/ प्रतिनिधी
इस्लामपूर - येथील डॉ. बाबुराव घोडके फाउंडेशन च्या वतीने प्रशासकीय, सामाजिक, वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय आणि गौरवास्पद कार्य करणाऱ्या पाच व्यक्तींना राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत .
त्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये विशेष उल्लेखनीय कार्य करणारे प्रा. डॉ. धनंजय ठोंबरे, प्रशासकीय क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्य कृषी मंडळाचे उपसर व्यवस्थापक सुभाष घुले, सामाजिक क्षेत्रामध्ये श्री. अभय तोडकर, तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉ. सचिन पाटील आणि डॉ. माणिक हिरवे हे पुरस्काराचे मानकरी ठरले.
डॉ. बाबुराव घोडके दादा यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिन गुरुवार दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी आहे. सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक आणि प्रशासकीय कार्याचे विशेष दखल घेऊन डॉ. बाबुराव घोडके फाउंडेशन च्या वतीने राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार २०२४ कोणेरी मठाचे मठाधिपती
श्री. काडसिद्धेश्वर स्वामीजी आणि अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
आजवर या फाउंडेशन च्या वतीने निरनिराळ्या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या ३० मान्यवरांना पुरस्कार देऊन यथोचित पणे सन्मानित करण्यात आलेले आहे. समाजामध्ये प्रेरणा निर्माण व्हावी इतरांना आदर्श घ्यावा हा यामागील उदात्त, उत्कट आणि उत्तुंग हेतू आहे. सदर कार्यक्रम मिलन हॉल , दत्त टेकडी समोर, अक्षर कॉलनी इस्लामपूर, ता. वाळवा येथे सकाळी १०:०० वाजता संपन्न होणार आहे. अशी माहिती फौंडेशनचे इंजि. गणेश पाटील, दत्तात्रय माने, प्रा. डॉ. दीपक स्वामी, साहित्यिक दि.बा.पाटील , प्रा.डॉ. सुरज चौगुले, राष्ट्रपती पारितोषिक विजेते सर्जेराव टकले, बजरंग कदम , सुरज नारळे, संतोष भिसे, विनायक माळी, सुनील मलगुंडे, श्रीधर विरकर, सुधीर बंडगर, अमेय घोडके, आदित्य घोडके आदी मान्यवर यांनी दिली. पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.