गणपती चौकातील श्री गणेश मूर्तीवर दगडफेक प्रकरणी एकास अटक
विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
शहरातील गणपती चौकातील श्री गणेश मूर्तीवर झालेल्या दगडफेकीच्या प्रकरणी गांधी चौक पोलिसांनी १० तासातच या प्रकरणाचा छडा लावला असून याप्रकरणी सोहेल जमादार (21) याला अटक करण्यात आली आहे.
गांधी चौक सीपीआय प्रदीप तळकेरी आणि पथकाने सोहेल यास ताब्यात घेतले आहे तर दुसरा आरोपी सोहेलचा मित्र फरार आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी सापळा रचला आहे. घटनेनंतर लगेचच एसपी हृषिकेश सोनवन यांनी सीपीआय तळकेरी यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केली. सीसीटीव्ही फुटेज आणि गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षाचा क्रमांकावरून आरोपीची ओळख पटली
आरोपी सोहेल जमादार याने काल रात्री एकच्या सुमारास गणपती चौकातील श्री गणेश मूर्तीवर दगडफेक केली. एसपी हृषिकेश सोननय यांनी सांगितले की मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सोहेलने दगडफेक केल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या होमगार्ड बरोबर शिवीगाळ केली असे सांगितले.