आंतरराज्य टोळीतील दोघा चोरांना अटक
विजयपूर/प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
आंतरराज्य टोळीतील दोघा चोरांना अटक करण्यात आले असल्याचे माहिती जिल्हा पोलिस प्रमुख ऋषिकेश सोनावणे यांनी दिली. विजयपूर शहरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, विकी चव्हाण आणि संजू पवार हे महाराष्ट्रातील सांगलीचे रहिवासी असून अटक करण्यात आलेले आरोपी आहेत. विजयपूर जिल्ह्यातील सीमेवर असलेल्या संख गावात विकी चव्हाण हा संशयास्पदरीत्या फिरत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो व त्याचा सहकारी चोरीचा प्रकरणात सहभाग असल्याचे कबुली दिली.
पोलिसांनी त्यांच्याकडून 184.57 ग्रॅम सोने, 80 ग्रॅम चांदी, गुन्ह्यात वापरलेली कार आणि अन्य साहित्य असा अंदाजे 9 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच या टोळीतील आणखी पाच जण फरार झाले आहेत. त्याच्यावर एकूण 8 गुन्हे दाखल आहेत. त्यासाठी पोलिसांनी उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे जिल्हा पोलिस प्रमुख त्रृषिकेश सोनावणे यांनी सांगितले.