Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

पंचाळेत गंगागिरी महाराज सप्ताह ध्वजावतरण कार्यक्रम संपन्न

Responsive Ad Here

  पंचाळेत गंगागिरी महाराज सप्ताह ध्वजावतरण कार्यक्रम संपन्न


 थोर देणगीदार व्यक्ती व गाव प्रतिनिधी यांचा सत्कार






वावी प्रतिनिधी (दि.६) राम सुरसे 


सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे श्रीरामपूर  तालुक्यातील महंत गंगागिरी महाराजांच्या सरला बेटाच्या वतीने दि.१० ऑगस्ट ते १७ ऑगस्ट दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.या सप्ताहासाठी २४ जुलै रोजी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला होता.या सप्ताह कालावधीमध्ये अखंड भजन,अन्नदान,कृषी प्रदर्शन,प्रवचन व कीर्तन संपन्न झाले होते. संपुर्ण  सप्ताह कार्यक्रमास  पंन्नास लाख भाविकांनी उपस्थिती दर्शवली होती. या सप्ताहाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.सप्ताह कालावधीत झालेल्या जमाखर्चाचा हिशोब झाल्याखेरीज ध्वज उतरविला जात नाही. सप्ताह समितीचे  शिवाजी महाराज तळेकर , संभाजी जाधव ,अरुण थोरात, कैलास थोरात, आनंदा थोरात,गणेश थोरात यांनी पंधरा दिवसापूर्वी सप्ताहाचा संपूर्ण हिशोब सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्याकडे सुपुर्द केला. तदनंतर महाराजांनी दि.६ ऑक्टोबर रोजी  ध्वज अवतरण कार्यक्रमाची तारीख दिली.


पंचाळे येथील सप्ताह  ध्वज अवतरण कार्यक्रम रविवार दि. ६ रोजी महंत रामगिरी महाराज व आमदार अॕड.माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

सर्वांच्या सहकार्यातून भव्य दिव्य असे कार्य होऊ शकते याचा प्रत्यय सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे झालेल्या सप्ताहाच्या माध्यमातून दिसून आला.पंचाळे पंचक्रोशीतील भावीकांसाठी बारा वर्षाची तपश्चर्या पूर्ण झाल्याचा मलाही मनस्वी आनंद आहे असे गौरवोद्गार  महंत रामगिरी महाराज यांनी व्यक्त केले. सर्व राजकीय, सामाजिक कार्यकर्ते,ग्रामस्थ, पोलीस दल, स्वयंसेवक, पत्रकार यांचे महाराजांनी सप्ताह योगदानाबद्दल आभार मानले. 

यावेळी मधुकर महाराज, राजेंद्र घुमरे,विजय काटे,राजेश गडाख, विनायक घुमरे, ह.भ.प. भगुरे गुरुजी ,शिवाजी महाराज तळेकर, हरी ओम महाराज गवळी ,प्रसाद महाराज कानडे ,उत्तम पदाडे आदी सह पाच हजार भाविक उपस्थित होते. यावेळी सप्ताह कमिटीने सप्ताहाचा केलेला जमा खर्चाचा तपशील कैलास थोरात यांनी सादर केला.अरुण थोरात यांनी प्रास्ताविक केले. सप्ताह साठी योगदान देणाऱ्या देणगीदार,कमिटी सदस्य व पत्रकार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.पत्रकारांच्या वतीने प्रभाकर बेलोटे व राम सुरसे यांनी  सर्व दैनिकांच्या सप्ताह काळातील वृत्तांकण बातमीपत्राची संकलित फाईल महंत रामगिरी महाराज यांना तसेच सप्ताह समितीचे अध्यक्ष संभाजी जाधव यांना सुपूर्द केली.

  सप्ताहासाठी पन्नास हजाराच्या पुढे देणगी देणाऱ्या दानशूर व्यक्ती व एक लाखाच्या पुढे देणगी दिलेल्या गावांचा प्रतिनिधिक स्वरूपात  आ.कोकाटे व  महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी या ध्वजावतरण कार्यक्रमानिमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. 



-------------------------------------------------------

  सरला बेटास भरीव आर्थिक मदत


 पंचाळे येथे संपन्न झालेल्या सप्ताह समितीच्या वतीने सरला बेटास  सतरा लाख अकरा हजार एकशे सत्यात्तर  रुपयांचा धनादेश महंत रामगिरी महाराज यांना आ.माणिकराव कोकाटे,संभाजी जाधव,शिवाजी महाराज तळेकर,कैलास थोरात,अरुण थोरात आनंदा थोरात यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला.


-------------------------------------------------------

  सप्ताह  कालावधीत पाऊस झाला नाही परंतु सप्ताह संपताच भरपूर पाऊस झाल्याने  बंदिस्त पूर चाऱ्या प्रवाहीत झाल्या व पुर्व भागातील पाझरतलाव भरभरून वाहू लागले. सिन्नर तालुक्यावर महंत रामगिरी महाराजांची सदैव कृपा राहो व आम्ही जेव्हा सप्ताहाची मागणी करू तेव्हा महाराजांनी आम्हाला होकार द्यावा आम्ही सदैव तयार आहोत. कारण सिन्नरच्या एका भागात पाऊस होतो तर दुसर्या भागात पाऊस न होताही बंदीस्त पुरचारी करवी पाणी येऊन आम्ही आनंदी होतो.देवनदीच्या पुरकालव्यांमुळे आमचा शेतकरी सुखी झाला आहे. 


:-   माणिकराव कोकाटे आमदार सिन्नर